Women's Day 2024 : संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी महिलांचं (Women's Day 2024) प्रमाण जवळपास निम्मं आहे. महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही. आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी झगडावं लागलं, लढावं लागतं. 


8 मार्चला संपूर्ण 'जगभरात महिला दिन' (International Women's Day 2024) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ठिकठिकाणी, ऑफिसेसमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहितीय का? जगभरात महिला दिन का साजरा केला जातो? कधीपासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली? असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात, तसेच, जागतिक महिला दिनाचं महत्त्व जाणून घेऊयात... 


पहिला जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात आला? (When Was First International Women's Day Celebrated?)


आंतरराष्ट्रीय महिला दिन ही खरं तर कामगार चळवळीची निर्मिती आहे. याची सुरुवात 1908 मध्ये झाली, जेव्हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सुमारे 15 हजार महिला त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या. कामाचे तास कमी करावेत, केलेल्या कामांनुसार मोबदला मिळावा आणि मतदानाचा हक्कही मिळावा, अशी या महिलांची मागणी होती. महिलांच्या या निषेधाच्या एका वर्षानंतर, अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली.


जागतिक महिला दिनाचा इतिहास काय? (What Is History Of International Women's Day?)


8 मार्च 1908 रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीनं क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. 


भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोनं 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. 


1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीनं विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केलं. त्यानुसार संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.


भारतात महिला दिन कधीपासून साजरा केला जातो? (Since When Is Women's Day Celebrated in India?)


भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोनं 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.  


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Happy Womens Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव!