Happy Womens Day 2024 : दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women Day) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या समाजातील महिलांचं सक्षमीकरण करणं आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणं. तसेच, त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांच्यासह इतरांनाही करून देणं.
आजही अनेक देशांमध्ये स्त्री-पुरुष समानतेत खूप फरक आहे, आजही अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांसारखे अधिकार दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत लैंगिक समानतेचा संदेश जगभर पोहोचवणं हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरी आणि योगदानाची नोंद घेणं आणि सर्व लैंगिक पूर्वग्रह, रूढी आणि लैंगिक भेदभाव यापासून मुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेनं काम करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील खास स्त्रीला शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी काही खास संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात खास स्थान असलेल्या महिलेला पाठवू शकता.
तुमच्या आयुष्यात अढळ स्थान असणाऱ्या मैत्रिणींना पाठवा काही खास संदेश :
- अहिंसा हा आपल्या जीवनाचा धर्म आहे, त्यामुळे भविष्य महिलांच्या हातात आहे : महात्मा गांधी
- महिलांची परिस्थिती सुधारल्याशिवाय जगाची प्रगती शक्य नाही. एका पंखाच्या जोरावर पक्षी उडू शकत नाही : स्वामी विवेकानंद
- मी समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो : बाबासाहेब भीमराव आंबेडकर
- महिलांना कमकुवत समजणे हा गुन्हा आहे, हा पुरुषांकडून महिलांवर अन्याय : महात्मा गांधी
- आपल्या विवेकाचे पालन करणारी स्त्री जीवनात एक असा टप्पा गाठते जिथे कोणीही पोहोचू शकत नाही : अल्बर्ट आईनस्टाईन
- प्राचीन भारतातील महिलांना आदर्श मानूनच आपण महिलांचे सक्षमीकरण करू शकतो : स्वामी विवेकानंद
- समाज बदलण्याचा जलद मार्ग म्हणजे जगातील महिलांना संघटित करणे : चार्ल्स मलिक
- महिला सक्षमीकरणापेक्षा विकासाचे कोणतेही प्रभावी साधन नाही : कोफी अन्नान
- महिलांवर कोणतेही कायदेशीर बंधन असू नये जे पुरुषांवर लादले जात नाही : महात्मा गांधी