International Everest Day 2024 : डर के आगे जीत है..! हे वाक्य आपण नेहमीच इतरांच्या तोंडातून ऐकत असतो. पण याचा खरा अर्थ 'त्या' दोघांना केव्हाच उमगला होता... माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, जे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. आज आंतरराष्ट्रीय माउंट एव्हरेस्ट दिवस आहे. दरवर्षी 29 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. पण हा दिवस का साजरा केला जातो? काय आहे त्यामागील इतिहास? सर्वकाही जाणून घ्या...
आंतरराष्ट्रीय माउंट एव्हरेस्ट दिवस साजरा का केला जातो?
मी परीक्षेत यश मिळवू शकेन का, मुलाखत पास करू शकेन का? कामाच्या ठिकाणी दिलेले टार्गेट मी गाठू शकेल? असे अनेक भीतीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. मात्र अशा प्रश्नांवर जास्त विचार करण्यापेक्षा आपलं मुख्य उदिष्ट काय आहे यावर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. आणि जेव्हा तुमचे तुमच्या ध्येयावर लक्ष असते. तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट कठीण वाटत नाही. तुम्ही त्याला बिनधास्त सामोरे जाता. डर के आगे जीत है..! हे वाक्य आपण नेहमीच इतरांच्या तोंडातून ऐकत असतो. पण याचा खरा अर्थ 'त्या' दोघांना केव्हाच उमगला होता... माउंट एव्हरेस्ट तसा सर्वांनाच माहित आहे. हा जगातील सर्वात उंच शिखर आहे, 29 मे 1953 रोजी एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे या दोघांनी हा भला मोठा एव्हरेस्ट पार केला होता. त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय माउंट एव्हरेस्ट दिवस साजरा केला जातो. 2008 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत हा दिवस साजरा केला जातो.
गिर्यारोहकांच्या सन्मानार्थ दिवस..!
एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 8848 मीटर आहे. हिलरी आणि नोर्गे 29 मे 1953 रोजी एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यशस्वी झाले होते. नेपाळ पर्यटनाला चालना देणे हा यामागचा आणखी एक उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस हा नेपाळद्वारे गिर्यारोहकांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. एव्हरेस्ट शिखर नेपाळ आणि चीन (तिबेट) च्या सीमेवर आहे.
आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवसाचा इतिहास
1953 मध्ये म्हणजे 71 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 29 मे रोजी न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी यांनी नेपाळच्या तेनझिंग नोर्गेसोबत एव्हरेस्टवर चढाई केली होती, त्यात त्यांना यशही मिळाले होते. 2008 मध्ये एडमंड हिलरी यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा केला जातो. एव्हरेस्टवर चढाई करण्याची गिर्यारोहकांची ही प्रक्रिया आजही सुरू आहे.
माउंट एव्हरेस्ट हे नाव कसे ठेवण्यात आले?
1830 ते 1843 पर्यंत सरकारी सर्वेक्षण ऑफ इंडियाचे संचालक जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरून माउंट एव्हरेस्टचे नाव ठेवण्यात आले आहे. हिमालयातील पर्वत मोजणारे ते पहिले व्यक्ती होते.
एव्हरेस्ट शिखर जिंकण्याची प्रेरणा देणारा दिवस
आंतरराष्ट्रीय माउंट एव्हरेस्ट दिवस हा केवळ एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर या प्रवासात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. हा दिवस गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखर जिंकण्याची प्रेरणा देतो.
हेही वाचा>>>
World Digestive Health Day 2024: पचनक्रियेचे 'हे' 5 कर्करोग ठरतील प्राणघातक! निरोगी जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचंय? तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )