International Day of Happiness: अनेक लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींची आनंद होतो. मन आनंदी असेल तर शरीर देखील निरोगी राहतं, असं म्हणतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी क्षण शोधणं हे फार अवघड झालं आहे, असं अनेकांचे मत आहे. दरवर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिवस (International Day of Happiness) साजरा केला जातो. जाणून घेऊयात या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम...
इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेसचा इतिहास (International Day of Happiness)
2011 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने असा ठराव केला होता की आनंद हा मूलभूत मानवी हक्क असावा. प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा मानवी आनंद आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यावर आधारित असावा. 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. 2013 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यात आला.
यंदाची थीम (This year theme)
आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाची दरवर्षीची थीम ही वेगळी असते. इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेसची यावर्षाची थीम ही बी माइंड, बी ग्रेट फूल, बी काइंड (Be Mindful. Be Grateful. Be Kind) अशी आहे.
असा साजरा करु शकता आंतरराष्ट्रीय आनंद दिन
आपल्या प्रिय व्यक्तीसोबत संवाद साधा- अनेक वेळा कामामध्ये व्यस्त असल्यानं आपण काही प्रिय व्यक्तींसोबत संवाद साधू शकत नाही. तुम्ही मित्र-मैत्रीणींसोबत किंवा कुटुंबातील लोकांसोबत संवाद साधू शकता. अचानक त्यांना फोन केल्यानं किंवा मेसेज केल्यानं त्यांना आनंद होऊ शकतो.
अनेक वेळा आपल्या आजूबाजूला फिरत असलेल्या लोकांकडे आपलं लक्ष जात नाही. अनेकवेळा काही लोकांना मदत हवी असते. वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करणे, हरवलेल्या व्यक्तीला रस्ता सांगणे अशा प्रकारची मदत करुन तुम्ही लोकांना आनंद देऊ शकता.
लाफ्टर थेरिपी : लाफ्टर हे स्ट्रेस बस्टर आहे, असं म्हणतात. तुम्ही लाफ्टर थेरिपी करु शकता. तसेच एखादी कॉमेडी फिल्म देखील तुम्ही आंतरराष्ट्रीय आनंद दिनानिमित्त पाहू शकता.
मेडिटेशन करा : मेडिटेशन केल्यानं ताण जातो. मेडिटेशनमुळे मन शांत आणि आनंदी होते. आज दिवसभरातील काही मिनिटं तुम्ही मेडिटेशनसाठी देऊ शकता.
वेगवेगळ्या कारणांनी तणावामध्ये वाढ...
आर्थिक अडचणी, कामाचा स्ट्रेस या गोष्टींमुळे अनेकांमध्ये तणाव निर्माण होतो. अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद हरवला आहे. सोबतच इंटरनेटचा प्रभाव असल्या कारणानं लोकं आभासी दुनियेत अधिक व्यस्त आहेत. अशा तणावात आनंदी क्षण निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :