Happy Independence Day 2024 Wishes : 15 ऑगस्ट अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, यंदा 15 ऑगस्टला भारत देश 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी लोक एकत्र जमून ध्वजारोहण करतात, राष्ट्रगीत गातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्हालाही स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi) द्यायच्या असतील, तर हे कोट्स आणि मेसेज आताच सेव्ह करून ठेवा, आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना सुंदर शुभेच्छा द्या.. हे मेसेज तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. (Happy Independence Day Wishes In Marathi)


 


स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा, मेसेज आताच सेव्ह करून ठेवा, 15 ऑगस्टच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना सुंदर शुभेच्छा द्या..



जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 


सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. 
हॅपी 15 ऑगस्ट...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...



जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो 
तो माझा भारत देश आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 



गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, 
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, 
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश, 
देता सदा सर्वदा… 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



देशाला मिळालं स्वातंत्र्य 
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, 
चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...



ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा…
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… 
जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा… 
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...


 


 


देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, 
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 


वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



‘वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’


 


आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल, 
शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल, 
आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा… 
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा 
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, 
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


 


हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, 
संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. 
वंदे मातरम्, भारत माता की जय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 



स्वातंत्र्यदिनानिमित्त Whatsapp वर स्टेटस ठेवण्यासाठी कोट्स


दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..



दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..



देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..



कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..



ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल? स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..



जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..


 


हेही वाचा>>>


Travel : 15 ऑगस्टचं निमित्त...अन् भारतीय रेल्वेतर्फे कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी! स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाचा इतिहास, संस्कृती जाणून घ्या


 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )