Sangli Crime News: सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील याच्यावर अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा (Sangli Crime News) प्रयत्न झाला आहे. यावेळी सुदैवाने अचानक हल्लेखोराच्या रिव्हॉल्वरचे पिस्टल लॉक झाल्याने (Sangli Crime News) तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. थोडक्यात अनर्थ टळला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटील हा कामानिमित्त कवठेमहांकाळ शहरात तहसीलदार कार्यासमोरील एका मोबाईल दुकानात गेला होता. आपल्या सहकारी मित्रांसोबत मोबाईल दुकानात बसलेले असतानाच एका अज्ञाताने दुकानामध्ये प्रवेश करत बंदूक बाहेर काढली व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण अचानक पिस्टल लॉक (Sangli Crime News) झाल्याने अभिजीत पाटील थोडक्यात बचावला. या घटनेनंतर अभिजीत व त्याच्या सहकाऱ्यांनी अज्ञात हल्लेखोराचा पाठलाग केला. मात्र, हल्लेखोर पसार झाला.


ही संपूर्ण घटना मात्र हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हल्लेखोर (Sangli Crime News) मात्र या प्रकारानंतर पसार झाला आहे. कवठेमहांकाळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला. मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी बाहेर पडली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.


शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे अभिजित सुपुत्र आहेत. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा (Sangli Crime News) प्रयत्न केला. पण, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. यामुळे अभिजित थोडक्यात बचावले.