Srawan 2022 : येत्या 29 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात मुसळधार पाऊस पडतो. आजूबाजूला हिरवळ असते. पावसाचा महिना म्हणजेच श्रावण हा भगवान शिवाला समर्पित आहे. आध्यात्मिक आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे. या महिन्यात हे विशेष उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी येते. पैशाची कमतरता भासत नाही.  


पावसाच्या साचलेल्या पाण्यात ग्लासभर दूध टाकून आंघोळ करावी. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते. असे मानले जाते की हा खात्रीशीर उपाय केल्याने व्यक्तीचे कर्ज लवकर संपते.


शुक्रवारी पावसाचे पाणी पितळेच्या भांड्यात जमा करावे. त्यानंतर या पाण्याने लक्ष्मीचा जलाभिषेक करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यातून पैसा येऊ लागतो. देवी लक्ष्मीचा जलाभिषेक केल्यानंतर कमळाचे फूल अर्पण करावे.


ज्या लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे आणि घरात गरीब आहे. अशा लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरेल. सर्व प्रथम मातीचे भांडे घ्या. त्यानंतर त्या घागरीत पावसाचे पाणी भरावे. आता ही घागर घराच्या उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने घरात लक्ष्मी वास करते असे मानले जाते. घरची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि गरीब दूह होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :