Important Days in 22st April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 एप्रिलचे दिनविशेष.
वसुंधरा दिवस
वसुंधरा दिवस हा जगभरातून पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धनासाठी जागृती दिवस म्हणुन जगभरात पाळला जातो. अमेरिकेत वसुंधरा दिवस हा 22 एप्रिल रोजी पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे हाच दिवस 20 मार्च रोजी म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी पाळतात.
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत 22 एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे 20 मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.
प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या
22 एप्रिल 2006 ची ती वाईट सकाळ होती. प्रमोद महाजन त्यांच्या घरी होते. त्याच दिवशी त्याचा भाऊ प्रवीण याच्याशीही काही कारणावरून भांडण झाले. हा वाद 15 मिनिटे चालला आणि काही वेळातच त्यांचा लहान भाऊ प्रवीण महाजन याने त्यांच्यावर गोळीबार केला. 15 मिनिटांच्या या लढतीत असं काय होतं की प्रकरण गोळीबारापर्यंत पोहोचलं. या गोळीबारात भाजप नेते प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला.
1921 - नेताजी सुभआषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसची उच्चभ्रू नोकरी नाकारली
1958 - एडमिरल आर डी कटारी भारतीय नौसनेचे पहिले भारतीय प्रमुख बनले
1983 - अंतरिक्ष यान सोयूज टी-8 पृथ्वीवर परतले
2021 - युवा विश्व चॅपियनशिप फायनलमध्ये फायनलमध्यो पोहचलेल्या सात भारतीय महिलांनी सुवर्ण पदक जिंकले
2021 - ऐसी दिवानगी देखी नहीं कही, घुंगट की आड से या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणऱ्या नदीम - श्रवण यांच्यापैकी श्रवण राठोड यांचे निधन
बलदेव राज चोप्रा यांची जयंती
बलदेव राज चोप्रा हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माता होते. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात नया दौर (1957), कानून (1960), वक्त (1965), हमराझ (1967) आणि दूरदर्शन मालिका महाभारत यांच्या निर्मितीसाठी ते विशेषतः ओळखले जातात. 1998 मध्ये, त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.