Important days in 15th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 15 एप्रिलचे दिनविशेष.
1452 : इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म.
लिओनार्दो हे 15व्या शतकात रेनेसान्स काळात झालेले एक महान चित्रकार आणि संशोधक होते. कलेच्या इतिहासात त्यांनी संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दो यांनी अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्यांची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत.
1469 : शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म.
शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू गुरुनानक यांचा जन्म रवी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात कार्तिकी पौर्णिमेला खतरिकूल येथे झाला. काही जाणकार, 15 एप्रिल, 1469 रोजी झाला असे मानतात. मात्र, कार्तिक पौर्णिमेला गुरू नानक जयंती साजरी करण्याची परंपरा प्रचलित आहे.
1865 : अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ 1861 ते 1865 असा होता. त्यांनी अमेरिकेतील लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले. जात-पात, गोरे-काळे सगळे समान आहेत, त्यांच्यात भेद नाही, अशी त्यांची धारणा होती.
1922 : मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
1932 : मराठी भाषिक कवी आणि गझल सम्राट सुरेश भट यांचा जन्मदिन.
कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट.15 एप्रिल 1932 रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. 1961 मध्ये ‘रुपगंधा’हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. ‘गझल’ हा काव्यप्रकार सुरेश भटांमुळे सामान्य रसिकांमध्ये लोकप्रिय झाला.
जगभरातील अनेक देशांमध्ये संस्कृती, रोरिक करार आणि शांततेच्या बॅनरला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 15 एप्रिल रोजी सार्वत्रिक संस्कृती दिन साजरा केला जातो.
कलात्मक अभिव्यक्तीच्या विविधतेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी कलाकारांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी दरवर्षी 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिन साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या :