Important days in 13th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 13 एप्रिलचे दिनविशेष. 


1699 : गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. 


खालसा हा शिख धर्माचा एक संप्रदाय आहे. 1699 मध्ये शीख धर्माचे दहावे गुरू, गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. शिखांनी खालसाची स्थापना बैसाखीच्या सणानिमित्त केली .   


1919 : जालियनवाला बाग हत्याकांड


एप्रिल 13, इ.स. 1919 या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या हत्याकांडामधे 379 लोकांचा मृत्यू झाला. 


1942 : व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.


शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली. सन 1942 साली व्ही. शांताराम यांनी 1942 साली प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि ‘राजकमल कला मंदिर’ या चित्रसंस्थेची स्थापना केली. 


1956 : अभिनेते सतीश कौशिक यांचा जन्म 


1956 - सतीश कौशिक हे भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत, जे प्रामुख्याने हिंदी चित्रपट आणि थिएटरमध्ये काम करतात. मिस्टर इंडिया या चित्रपटातील "कॅलेंडर"ची भूमिका त्यांची विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांनी तेरे नाम, जाने भी दो यारो, हम आपके दिल मे रेहते है या चित्रपटातील विनोदी भूमिका त्यांच्या लोकप्रिय ठरल्या. 


1973 : बलराज साहनी यांचे निधन.  


बलराज हे भारतीय चित्रपट आणि रंगमंच अभिनेता होते. धरती के लाल, दो बिघा जमीन, गरम हवा, छोटी बहन आणि काबुलीवाला या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध होते.


1890 : रामचंद्र गोपाळ "दादासाहेब" तोरणे यांचा जन्मदिन.


रामचंद्र गोपाळ तोरणे हे दादासाहेब तोरणे म्हणूनही ओळखले जाणारे एक भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता होते. जे भारतातील पहिला फिचर फिल्म, श्री पुंडलिक बनवण्यासाठी प्रसिद्ध होते.


1895 : भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म.


सन 1895 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पॅथॉलॉजिस्ट (रोगनिदानतज्ञ) तसचं, भारतातील वैद्यकीय संशोधनाचे जनक वसंत रामजी खानोलकर यांचा जन्मदिन. कर्करोग, रक्त गट आणि कुष्ठरोग या सारख्या साथीच्या आजारांचे संशोधन करण्यात त्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले.


2000 : अभिनेत्री लारा दत्ताने विश्वसुंदरीचा किताब पटकावला. 

लारा दत्ता ही एक भारतीय अभिनेत्री आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या लारा दत्ताने 2000 साली फेमिना मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स ह्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. तिने 2003 साली अंदाज ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


महत्वाच्या बातम्या :