Why : 'वाय' (Why) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सत्य घटनांवर आधारित सिनेमा असणार आहे. कल्पनेपलिकडील वास्तवाची 'ती' च्या लढ्याची गोष्ट 'वाय' सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'वाय' सिनेमाचे नुकतेच पोस्टर आऊट झाले आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत असणार आहे. कन्ट्रोल-एन प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'वाय' सिनेमाच्या पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या 'वाय' मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहे. पोस्टरवरून हा सिनेमा महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसत आहे.
सिनेमासंदर्भात दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणाले,"सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी कथा 'वाय' सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमाला नक्कीच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल".
संबंधित बातम्या