Chat Masala Recipe : चटपटीत चाट मसाला खायला अनेकांना आवडतो. अनेक जण चाट मसाला फळांसोबत खातात. तर काही लोक भाज्यांची चव चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये चाट मसाला मिक्स करतात. पाणी पूरी, दही पूरी आणि भेळ या चटपटीत पदार्थांची चव चाट मसाल्यामुळे अजून चांगली होते. घरात नेहमी असणाऱ्या साहित्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरीच चाट मसाला तयार करू शकता. जाणून घेऊयात चाट मसाला तयार करण्याची सोपी पद्धत 


चाट मसाला तयार करण्याची पद्धत-


चाट मसाला तयार करण्यासाठी तुम्हाला जीरे, काळी मिर्ची, हिंग, काळं मिठ आणि आमचूक पावडर हे साहित्य लागेल. एका नॉन स्टिक पॅनमध्ये जीरे टाकून ते 1 मिनीट भाजा. त्यानंतर ते भाजलेले जीरे आणि काळी मिर्ची मिक्सरमध्ये टाकून बारिक करून घ्या. आता ही जीरे आणि काळ्या मिर्चीची पावडर चाळून घ्या. त्यानंतर या पावडरमध्ये काळ मिठ, आमचूर, हिंग टाका. हा तयार झालेला चाट मसाला एका एअरटाइट डब्यामध्ये ठेवा. हा मसला  तुम्ही अनेक महिने फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.  तसेच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये किंवा भाज्यांमध्ये हा मसाला तुम्ही मिक्स करू शकता. 


Yoga Benefits And Belly Fat : झटपट वजन कमी करणारी 3 योगासनं; स्लीम अन् ट्रीम होण्यासाठी करतील मदत



टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :