एक्स्प्लोर

Home Tips : थंडी असो वा उन्हाळा; रोजच्या वापरात येणारे चादर आणि टॉवेल किती दिवसांनी धुवावेत?

Home Tips : निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Home Tips : निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची (Clinliness) काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. काही लोक दर आठवड्याला त्यांची चादर (Bedsheet) आणि टॉवेल धुतात, तर काही लोक महिन्यानंतर धुतात. चादरी आणि टॉवेल धुण्याबद्दल लोकांची स्वतःची अशी मतं आहेत. पण, चादर आणि टॉवेल नेमके किती दिवसांनी धुवावेत याचं अचूक उत्तर मात्र कोणालाच माहीत नाही.  

खरंतर, जेव्हा आपण अंघोळीनंतर टॉवेल वापरतो तेव्हा शरीरात असलेले सूक्ष्म जंतू त्यात प्रवेश करतात. हे सूक्ष्म जंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. तसेच, काही लोकांन अंघोळीनंतर टॉवेल तसाच ओला बेडवर किंवा कुठेही ठेवण्याची सवय असते. ओला टॉवेल ठेवल्यामुळे त्या ठिकाणी जंतूंची पैदास होते. त्याचप्रमाणे ज्या पलंगावर तुम्ही रोज झोपता त्यावर मोठ्या प्रमाणात मृत पेशी, घाम, तेल आणि जंतू जमा होतात. टॉवेलचे फॅब्रिक बेडशीटपेक्षा जाड असते, त्यामुळे ते जास्त काळ ओले राहतात.

चादर कधी धुवावी? 

बेडशीट किंवा चादर कधी धुवायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते आपण कसं आणि किती वापरतो यावर अवलंबून आहे. जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली किंवा हिवाळ्यात तुम्ही स्वेटर घालून झोपलात तर तुमची चादर लवकर घाण होणार नाही. तर, जर तुम्ही दिवसभर धुळीत काम केले असेल, बाहेर राहिला असाल आणि अंघोळ न करता झोपत असाल तर मात्र चादर तुम्हाला दर तीन ते चार दिवसांनी धुवावी लागेल. जर तुम्ही स्वच्छता राखत असाल तर तुम्ही बेडशीट आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा धुवा. बेडशीट कधी धुवायची हे पूर्णपणे त्याच्या वापरावर अवलंबून असते.

टॉवेल कधी धुवायचे?

बेडशीटपेक्षा टॉवेल जास्त वापरला जातो, ज्यामुळे तुम्हाला तो जास्त वेळा धुवावे लागतो. टॉवेल बराच काळ ओला राहतो. तो पटकन सुकत नाही. त्यामुळे त्यामध्ये जंतू वाढू लागतात, त्यामुळे त्यांना लवकर स्वच्छ करणं गरजेचं आहे. अनेक वेळा असे घडते की टॉवेल वारंवार धुतल्यानंतरही त्यांना वास येत राहतो, असं का होतं? असा प्रश्न जर तुम्हला पडला असेल तर टॉवेल धुतल्यानंतरही दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात. काही लोक कपडे धुतल्यानंतर बराच वेळ मशिनमध्ये ठेवतात, त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येते. कधी कधी टॉवेलचे कापड व्यवस्थित सुकले नाही तरी त्यातून दुर्गंधी येऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Foods For Oral Health : निरोगी दात आणि हिरड्यांसाठी तुमच्या आहारात 'या' 8 सुपरफूड्सचा समावेश करा; हेल्दी राहाल

महत्त्वाच्या बातम्या

Dussehra 2026 Wishes : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
Dussehra 2026 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Embed widget