Skin Care Tips: चेहऱ्याचं सौंदर्य (Beauty Tips) जपण्यासाठी आपण एक ना अनेक उपाय शोधत असतो. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपासून अगदी घरगुती उपायांपर्यंत सर्व काही वापरुन होतं, पण फरक काही पडत नाही. तुमच्यासोबतही असंच होत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू की, तुम्ही प्रयत्न करताय, पण ते योग्य पद्धतीनं नाही. त्वचेसाठी काहीही करण्यापूर्वी सर्वात आधी तुम्ही तुमचा स्किन टाईप ओळखणं गरजेचं आहे. नॉर्मल स्किन (Normal Skin), ड्राय स्किन (Dry Skin), ऑयली स्किन (Oily Skin) की, कॉम्बिनेशन स्किन (Combination Skin). तुमचा स्किन टाईपनुसार, तुम्ही तुमच्या त्वचेसाठी (Skincare Routine) उपया करू शकता. 


जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्हाला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचा संवेदनशील असते आणि अशा त्वचेला काहीही लावल्यानं त्याची रिअॅक्शन येण्याची शक्यता वाढते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना त्यांच्या त्वचेनुसार, उत्पादनांचा वापर करावा लागतो. ज्याबाबत अनेकांना माहिती नसतं. 


जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्हीही अनेक उपाय करून हैराण झाला असाल, तर तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स... 


1. क्लिन्जर किंवा टोनर वापरणं टाळा 


त्वचा तेलकट असल्यास, क्लिन्जर किंवा टोनर वापरणं टाळावं. त्यात अल्कोहोल असतं, जे तेलकट त्वचेसाठी हानिकारक असतं. 




2. खोबऱ्याचं तेल टाळावं


ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणं टाळावं. लोक सामान्यतः त्वचेला मॉयश्चरायझर म्हणून खोबरेल तेल वापरतात. पण ही रेसिपी कोरड्या त्वचेसाठी काम करते. तेलकट लोकांसाठी हा तोट्याचा सौदा आहे. त्यांनी खोबऱ्याच्या तेलापासून दूर राहणंच फायदेशीर ठरतं. 


3. मिनरल ऑईल वापरणं थांबवा 


ऑईली स्किन असणाऱ्यांनी मिनरल ऑईलचा वापर करणं ताबडतोब थांबवावं. मिनरल ऑईलमुळे तुमच्या त्वचेवर तेलकटपण येतो. तसेच, त्वचेच्या छिद्रांमध्ये घाणंही अडकते. त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता अधिक वाढते. 




4. लॅनोलिन क्रीम


लॅनोलिन क्रीम देखील सामान्यतः कोरडी त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ऑयली स्किन असणाऱ्यांनी लॅनोलिन क्रीम्स वापरणं टाळावं. लॅनोलिन क्रीम चेहऱ्यावर लावल्या एक जाडसर थर त्वचेवर राहतो. त्यामुळे त्वेचेची छिद्र ब्लॉक होतात. त्वचा श्वास घेऊ शकत नाही. तेलकट त्वचेला यामुळे नुकसान होतं.  


5. पेट्रोलियम जेली


ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेली लावणं चांगलं, हे खरंच आहे. ज्याला स्लगिंग देखील म्हणतात, पण जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही पेट्रोलियम जेलीपासून लांब राहणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण पेट्रोलियम जेलीमुळे चेहऱ्यावर मुरमं तयार होऊ शकतात. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Hair Care Tips : केसातील कोंडा आणि खाजेनं हैराण झालायत? ट्राय करा कांद्याचे 'हे' 8 हेअर मास्क!