Forehead Tanning : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा सुंदर आणि निरोगी दिसत नाही.त्याकरीता स्किन रूटीन फाॅलो करणे गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात सूर्याची तीव्र किरणे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे हानी पोहोचवतात. याशिवाय धूळ आणि मातीच्या थेट संपर्कात आल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात. काही लोकांच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होते.त्वचेची काळजी घेणारी सर्व प्रोडक्ट वापरूनही कपाळ काळे दिसते. अशा परिस्थितीत घरगुती काही उपाय फायदेशीर ठरतात. याचा वापर करून तुम्ही कपाळावरील काळेपणा दूर करू शकता आणि त्वचा सुधारू शकता. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पद्धती.
कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठीचे उपाय
हळद (Turmeric)
हळदीमध्ये अँटीबॅक्टीरीअल गुण असतात. जे तुमच्या चेहऱ्याकचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होत असेल तर तुम्ही त्याचा वापर करून काळेपणा दूर करू शकता. यासाठी कच्च्या दुधात हळद मिसळा आणि कपाळावर लावा आणि 20 मिनिटे ठेवून ते मिश्रण कोरडे होऊ द्या. नंतर हलक्या हातांनी घासून स्वच्छ करा. असे नियमित केल्याने तुमच्या कपाळावरचे टॅनिंग निघून जाईल.
मध आणि लिंबू (Honey And Lemon)
कपाळावरचे टॅनिंग काढण्यासाठी मध आणि लिंब देखील तुम्ही लावू शकता. एक चमचा लिंबू आणि एक चमचा मध एकत्र करून तो एक तास लावून ठेवा. हे टॅनिंग कमी करू शकते. लिंबात ब्लीचिंग मोठ्या प्रमाणात असते. जे स्किन वरील डेड सेल्स काढून टाकायला मदत करते.
बेसन आणि हळद (Gram Floor And Turmeric)
चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी बेसन आणि हळद फायदेशीर आहे. तसेच टॅनिंग काढण्यासाठी बेसन आणि हळदीचा वापर करतात.यासाठी एका वाटीत दोन मोठे चमचे बेसन घ्या त्यात हळद मिसळून दूध किंवा पाणी घाला. 20 मिनीट हे मिश्रण लावून ठेवा आणि धुवून टाका.
बदामाचे तेल (Almond Oil)
बदामाच्या तेलाचा वापरही टॅनिंग काढण्यासाठी केला जातो. यासाठी एका वाटीत बदामाचे तेल , मध आणि दूधाची पावडर मिसळून घ्यावे. ही पेस्ट कपाळावर लावून ठेवा. काही मिनीटांने धुवून टाका.
कच्चे दूध (Raw Milk)
तुम्ही दूधात गुलाब पाणी मिसळून टॅनिंग झालेल्या भागात लावू शकतात. दूधात लॅक्टिक अॅसिड असते. जे त्वचेचा रंग सुधारायला मदत करते.
काकडी (Cucumber)
काकडीच्या रसाचा फायदा टॅनिंग काढण्यासाठी होतो.यात व्हिटामीन सी असते.ज्यामुळे स्किन ग्लोइंग बनते.
इतर महत्वाच्या बातम्या