Maharashtrachi Hasyajatra

  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या या कार्यक्रमातील समीर चौघुले (Samir Choughule) या अभिनेत्याच्या एका व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे समीरला माफी मागावी लागली आहे. 


समीरनं एका स्किटमध्ये तारपा नृत्य केलं होतं. त्याच्या या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समीरच्या या व्हिडीओवर अनेकांनी टीका केली. त्यानंतर समीरनं माफी मागितली आहे. एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, समीर म्हणतो,  'मी एका स्किटमध्ये नृत्य सादर केलं होतं. त्याची 30 सेकंदाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यात मी तारपा नृत्य सादर केलं होतं. माझ्या लक्षात आलं की, माझ्या आदिवासी  बंधू आणि भगिनींच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या.  यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो.'


पुढे समीर म्हणतो,'हा प्रकार पुन्हा होणार नाही याची मी ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झाला होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू आमचा कधीच नसतो.'






'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच समीने  (Samir Choughule)  जग्गू आणि ज्युलिएट, चंद्रमुखी, मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये काम केले आहे. 


महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra)  या शोमुळे समीरला विशेष लोकप्रियता मिळाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या शोमधील समीर चौघुले बरोबरच विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) करते. अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हे या शोचे परीक्षक आहेत. अनेक सेलिब्रिटी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :   


Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुले आणि कोहली फॅमिलीची धमाल कॉमेडी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा प्रोमो पाहून खळखळून हसाल