Holi 2022 India : भारत (India) हा देश विविध संस्कृतींनी परंपरांनी नटलेला आहे. या ठिकाणी विविधतेत एकता पाहायला मिळते. अशातच आता होळीच्या सणाची चाहूल लागली आहे. होळी (Holi 2022) हा सण आनंदाचा, उत्साहाचा, एकमेकांवर रंग उधळण्याचा. होळी हा भारतातील सर्वात प्रमुख आणि आनंदी सणांपैकी एक आहे. याच होळीच्या सणाविषयी जाणून घेऊयात...


होळी (Holi 2022) हा सण प्रामुख्याने वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. हा सण मोठ्या प्रमाणात हिंदू संस्कृतीत साजरा केला जातो. होळी (Holi 2022) हा वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्वपूर्ण सण आहे. यावेळी रंगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. होळी हा सण रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी प्रत्येकजण रंगांची उधळण करताना पाहायला मिळतो. 


यावर्षी होळी कधी आहे ? (Holi 2022 Date) 


या वर्षी, भारतात 18 मार्च 2022 (शुक्रवार) रोजी होळी (Holi 2022) साजरी केली जाणार आहे. तर, होलिका दहन (Holi 2022 Date) 17 मार्च 2022 रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार होलिका दहन, ज्याला होलिका दीपक असेही म्हणतात.


होलिका दहनाचे महत्त्व


होलिका दहनाचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्याला माहिती आहे. होळी (Holi 2022) दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. वसंत ऋतू मध्ये होळी खेळली जाते जी हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या आगमनाच्या कालावधी दरम्यान असते. होलिका जळाल्यावर जवळपासच्या भागाचे तापमान सुमारे 50-60 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. जेव्हा लोक होलिका दहन होताना होळीला प्रदक्षिणा घालतात तेव्हा उष्णतेमुळे शरीरातील जीवाणू नष्ट होतात आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते. देशाच्या काही भागात होलिका दहनानंतर लोकं कपाळावर त्याची राख लावतात. तर, दुसऱ्या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करून हा सण आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. 


होळीची पौराणिक कथा : (Holi Historical Importance)


हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. पौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव देशभरात साजरा होऊ लागला. अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha