Health Tips : जर तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढायची असेल, तर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि बियांपासून बनवलेले बटर खाऊ शकता. पीनट बटर (Peanut Butter) व्यतिरिक्त आजकाल अनेक ड्रायफ्रूट्स आणि बियांपासून बनवलेले बटर बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, पिनट बटर किंवा इतर कोणतेही बटर खाल्ल्याने नेमका शरीरावर काय फरक पडतो?  तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी कोणते बटर फायदेशीर आहे हे सांगणार आहोत. तर जाणून घेऊयात बटरचे फायदे. 


बदाम बटर  (Almond Butter) - बदाम हे पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. दोन चमचे बदाम बटरमध्ये सुमारे 7 ग्रॅम प्रथिने असतात, जे एका अंड्याइतके असते. त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असते. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते आणि कार्ब्स कमी असतात. हे हृदयासाठीही आरोग्यदायी आहे.


पीनट बटर (Peanut Butter) - पीनट बटरमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. याशिवाय हे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन नियासिनचा चांगला स्रोत आहे. हे पाचन तंत्र आणि मज्जासंस्थेसाठी देखील चांगले मानले जाते.


काजूचे बटर (keshayu Butter) - काजू बटरमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. दोन चमचे बटरमध्ये 6 ग्रॅम प्रथिने, 10 ग्रॅम कार्बन आणि 1 ग्रॅम फायबर असते. याबरोबरच काजूमध्ये आयर्न झिंक मॅग्नेशियम आणि फोलेट देखील योग्य प्रमाणात आढळतात.


हेझलनट बटर  (hazelnut butter) - हेझलनट बटरमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते. परंतु त्यात ओमेगा 6, ओमेगा 9, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, लोह यांसारखे पोषक घटक असतात. दोन चमचे बटरमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असते.


अक्रोड बटर (Walnut Butter) - अक्रोड बटरमध्ये प्रथिने कमी असतात. परंतु यामध्ये ओमेगा -3, मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच यामध्ये कार्बन कमी आहे. दोन चमचे बटरमध्ये 5 ग्रॅम प्रथिने असतात. हे डोळे आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार यापैकी कोणतेही बटर निवडू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha