Holi 2022 : होळीचा (Holi 2022) सण रंगांनी भरलेला असतो आणि रंग कोणाला आवडत नाहीत? मात्र, होळीमध्ये वापरण्यात येणारे रंग तुमच्या त्वचेसाठी चिंतेचे ठरू शकतात. होळीच्या रंगांमध्ये केमिकलयुक्त रसायने असतात जी तुमच्या त्वचेवर हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, पिगमेंटेशन, चिडचिड होणे, लालसरपणा येणे अशा अनेक त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. विशेष म्हणजे, ज्यांना होळीच्या रंगांची आधीच ऍलर्जी आहे. त्यांना या सगळ्याचा धोका जास्त असतो. होळीनंतर कोरडेपणा आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून त्वचा कशी निरोगी ठेवावी यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी...   


होळी खेळण्यापूर्वी :


होळी खेळण्याच्या किमान 20 मिनिटे आधी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावा. याशिवाय चेहऱ्यावर आणि शरीरावर ऑलिव्ह, नारळ, बदाम किंवा मोहरीचे तेल लावा. तुमचे संपूर्ण शरीर झाकलेले कपडे घाला जेणेकरुन तुमची त्वचा कमीत कमी रंगांच्या संपर्कात येईल. ओठांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी लिप बामचा जाड कोट लावा. तुमच्या नखांचे संरक्षण करण्यासाठी पारदर्शक नेल पेंट लावा. 


चेहरा स्वच्छ करा


होळी खेळल्यानंतर चेहऱ्यावरील सर्व रंग, तेल आणि घाण साफ करण्यासाठी चेहरा वारंवार धुवणे गरजेचे आहे. हे रंग बर्‍याचदा त्वचेला त्रास देतात आणि त्वचेवर कोरडेपणा आणू शकतात, म्हणून फेस वॉशसाठी चांगला क्लिन्झिंग बाम हा एक उत्तम पर्याय असेल. ते तुमच्या त्वचेवर कोमल राहतात. याशिवाय, तुम्ही आधी चेहऱ्यावरील रंग काढून टाकण्यासाठी तेल वापरू शकता आणि नंतर क्लिंजर वापरू शकता.


बदाम आणि मधाचे फेसपॅक लावा 


चेहऱ्याला पोषण देण्यासाठी तुम्ही हा DIY फेस मास्क देखील लावू शकता. यासाठी थोडे भिजवलेले बदाम घेऊन त्यात मध,2-3थेंब लिंबाचा रस आणि एक-दोन चमचे दुधात बारीक करा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि पूर्णपणे कोरडे होऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक स्किन हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतो. 


हायड्रेटिंग आणि पौष्टिक मॉइश्चरायझर निवडा


रंग तुमच्या चेहऱ्याला चिकटू नये म्हणून तुमच्या त्वचेला चांगल्या फॉर्म्युलेशनसह मॉइश्चरायझर लावा. हे मॉइश्चरायझर हायड्रेटिंग असले तरी ते तेलमुक्त असावे. हायलुरोनिक ऍसिड, सिरॅमाइड्स आणि ग्लिसरीन असलेले मॉइश्चरायझर्स चांगले पर्याय असू शकतात. ते त्वचेवर सौम्य असतात आणि संवेदनशील त्वचेसाठी चांगले असतात.


भरपूर पाणी पित राहा : 


होळी खेळताना रंगांमध्ये अशी काही रसायने असतात जी त्वचेतील ओलावा शोषून घेतात. अशा वेळी, तुमच्या त्वचेला हायड्रेेट करणे खूप गरजेचे आहे. यासाठी सतत पाणी पित राहा. 


होळी खेळताना त्वचेवर जळजळ होत असेल तर..


होळी खेळताना त्वचेवर खाज सुटणे किंवा जळजळ होत असल्यास ती जागा ताबडतोब थंड पाण्याने धुवा. थंड पाण्याने धुतल्याने जळजळ कमी होण्यास मदत होईल. पुढे, स्थानिक सुखदायक कॅलामाइन लोशन किंवा जाड मॉइश्चरायझर लावा.


रंग काढून टाकण्यासाठी त्वचेला घासू नका.


चेहऱ्याचा रंग काढण्यासाठी कधीही साबणाने तुमची त्वचा जोराने स्क्रब करू नका. यामुळे रंग कमी होईल पण त्वचेला जास्त नुकसान होईल. तुमचा चेहरा धुवण्यासाठी, साबणाऐवजी फेशियल क्लिन्झर किंवा बेबी ऑईल वापरा आणि नंतर भरपूर मॉइश्चरायझर लावा. तसेच होळीच्या आधी आणि नंतर आठवडाभर ब्लीचिंग, वॅक्सिंग किंवा फेशियल करणे टाळा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha