Juice For Eyes : आजकाल ऑफिसची बहुतांश कामे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये केली जात आहेत. 9-तासांच्या शिफ्टमध्ये बरेच लोक या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सतत वापर करतात. काही लोक यातून थोडं रिलॅक्स वाटण्यासाठी चित्रपट, वेब सिरीज पाहतात. अशा वेळी तुम्हाला हे माहित नसतं की जास्त वेळ स्क्रीनवर राहिल्याने आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअरमधील एका अभ्यासानुसार, संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. 


यामुळे तुम्हाला मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, रातांधळेपणा आणि डोळ्यांशी संबंधित इतर आजार होऊ शकतात. तथापि, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, सर्व पोषक आणि खनिजे समृध्द अन्न खाल्ल्याने डोळ्यांच्या गंभीर समस्या टाळता येतात. डोळे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते. आम्ही तुमच्यासाठी असेच काही पौष्टिक फळ आणि भाज्यांचे ज्यूस घेऊन आलो आहोत, जे पिल्याने तुमचे डोळे निरोगी राहतील.


1. संत्र्याचा रस


डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी संत्र्याचा रस फायदेशीर ठरतो. संत्र हे व्हिटॅमिन सी च्या मुख्य स्त्रोतांपैकी एक आहे. हा रस प्यायल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. 


2. बीट, गाजर आणि सफरचंदाचा रस


गाजरात असलेले व्हिटॅमिन ए रातांधळेपणाची समस्या दूर करून डोळे निरोगी ठेवण्याचे काम करते. बीटमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. हे मॅक्युलर आणि रेटिना आरोग्यास चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. सफरचंदांमध्ये भरपूर बायोफ्लेव्होनॉइड्स असतात. बायोफ्लाव्होनॉइड्स दृष्टी सुधारतात असे मानले जाते. 


3. पालक, ब्रोकोलीचा रस


हिरव्या पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे मानले जातात. यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनची उपस्थिती असते, जे हानिकारक किरणांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात. 


4. टोमॅटोचा रस


डोळ्यांना आवश्यक असलेले बहुतेक पोषक तत्व टोमॅटोच्या रसामध्ये असतात. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांमुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे घटक देखील आढळतात. हे एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडेंट आहे.


5. नारळाचं पाणी


नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक खनिजांसह अमीनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. नारळाच्या पाण्याचे दररोज सेवन केल्यास डोळ्यांचा त्रास कमी होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल