You Should Eat Egg Yolks Or Not: आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन डी (Vitamin D), व्हिटॅमिन ई (Vitamin E), व्हिटॅमिन के (Vitamin K), लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स अंड्यातील पिवळ्या भागात आढळतात.  मात्र, जर तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल, तर अंड्यातील पिवळा भाग कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मग नेमकं करावं काय? अंड कसं खावं? पिवळा भाग खावा की, पांढरा? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतात. सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊयात... 


तुम्हीही गोंधळात असाल की, अंड्याचा नेमका कोणता भाग खावा? तर प्रसिद्ध आहारतज्ञ आयुषी यादव यांनी याबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. अंड्यातील पिवळा भाग खाणं आरोग्यासाठी चांगले की वाईट? हे देखील त्यांनी सांगितलं आहे. 


अंड्यातील पिवळा भाग खाण्याचे फायदे



  • अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारखी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्व आणि खनिजं मुबलक प्रमाणात असतात. 

  • अंड्यातील पिवळ्या भागात कोलीन असतं, जे मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यांसाठी आवश्यक असतं.

  • अंड्यातील पिवळ बलकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे अँटिऑक्सिडंट असतात. हे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.

  • अंड्यातील पिवळ बलकमध्ये असलेल्या हेल्दी फॅट्समुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं, जे मर्यादित प्रमाणात खाल्लं तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • अंड्यातील पिवळा भाग उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जो दिवसभर ऊर्जा प्रदान करू शकतो.

  • अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये निरोगी फॅट्स असतात, जे एचडीएल म्हणजेच, चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. 

  • अंड्यातील पिवळ बलकमध्ये असलेलं व्हिटॅमिन डी कॅल्शियमचं शोषण करण्यास मदत करतं आणि हाडं मजबूत करतं.

  • अंड्यातील पिवळ बलकमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स त्वचेची लवचिकता वाढवू शकतात आणि वृद्धत्वाची लक्षणं कमी करू शकतात.


हेल्दी असूनही काहीजण अंड्याचा पिवळा भाग खाणं का टाळतात? 



  • अंड्यातील पिवळ्या भागात कोलेस्टेरॉलमध्ये जास्त असतं, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

  • अंड्यातील पिवळ्या भाग जास्त प्रमाणात खाल्ल्यानं खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ज्यामुळे  हृदयविकार होऊ शकतो.

  • ज्या लोकांना अंड्याची अॅलर्जी आहे, त्यांना अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्यानं समस्या वाढू शकतात.

  • कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यातील पिवळ बलकमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.

  • अंड्यातील पिवळ बलकांमध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं.

  • अंड्यातील पिवळा बलक खाल्ल्यास काही लोकांना पचनाच्या समस्या जाणवू शकतात.

  • काही लोकांना अंड्यातील पिवळ्या बलकाची चव आवडत नाही, त्यामुळे ते पिवळा भाग खाणं टाळतात.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Egg for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज खा अंडी; पण कशी, उकडून की तळून?