World Vitiligo Day : आज जागतिक विटिलिगो दिन. जगभरात दरवर्षी 25 जून रोजी जागतिक विटिलिगो दिन (World Vitiligo Day) साजरा केला जातो. हा त्वचेशी संबंधित आजार आहे. यामुळे व्यक्तीच्या शरीरावरील चेहरा, हात, पाय आणि गुप्तांगावरही पांढरे डाग पडतात. सुरूवातीला व्यक्तीची गडद त्वचा फिकट पडते. यानंतर हळूहळू त्वचेचा रंग उडतो. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी कमी व्हायला सुरूवात होते. विटिलिगो आजाराने पीडित व्यक्तीला सामाजिक आणि भावनिक समस्येलाही सामोरे जावं लागतं. ही समस्या लक्षात घेऊन दरवर्षी 25 जून रोजी जागतिक विटिलिगो दिन म्हणून साजरा केला जातो. विटिलिगो हा एक क्रॉनिक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. जो त्वचेशी संबंधित आजार आहे. या आजारात व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावरील त्वचेचा रंग आणि केसांचा रंगही पांढरा पडतो. यालाच आपण कोड फुटणे असं म्हणतो. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...
विटिलिगो (Vitiligo) आजार होण्यामागे ही आहेत कारणे
विटिलिगो हा एक ऑटोइम्यून आजार आहे. या आजाराने पीडित व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंडे मेलानोसाइट्सवर हल्ला करतात. यामुळे त्वचेतील मेलॅनिनच्या निर्मितीला ब्रेक बसतो. यामुळे विटिलिगोने पीडित व्यक्तीपासून कुटुंबातील इतर सदस्यांनाही होऊ शकतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे. जर एखाद्या पालकांना हा आजार असेल, तर त्यांच्यापासून जन्मलेल्या मुलांनाही विटिलिगो या त्वचारोगाचा संसर्ग होतो. या आजाराने पीडित व्यक्तीला उन्हाचा प्रचंड त्रास होतो. याच कारण त्वचेतील मेलॅनिनच्या निर्मिती ब्रेक बसलेला असतो. हे मेलॅनिन सूर्याच्या अतिनिल किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. ताण-तणावामुळेही हा आजार वाढू शकतो. हा वरवर सामान्य वाटणारा मात्र प्रत्यक्षात अत्यंत गंभीर आजार आहे. या आजाराने पीडित व्यक्तीला अनेक समस्येला सामोरे जावं लागतं. कारण हा पिढ्यान पिढ्यांना होणारा आजार आहे. त्यामुळे या आजाराच्या सुरूवातीलाच वेळेत उपचार मिळाले, तर त्वचेची काही प्रमाणात हानी थांबवता येते. पण हा पूर्ण बरा होणारा आजार नाही.
विटिलिगो आजाराची सुरूवातीची काही लक्षणे
विटिलिगो हा त्वचेशी संबंधित आजार आहे. या आजारात पीडित व्यक्तीच्या शरीरावर पांढरे डाग पडायला सुरूवात होते.
1. विटिलिगो आजारात सुरूवातीला याची काही लक्षणे दिसून येतात. व्यक्तीच्या शरीरावर बदल दिसून येतात. जसे की, कोपरा, तोंड, नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजूला पांढरे डाग पडायला सुरूवात होते.
2. या आजाराने पीडित व्यक्तीच्या डोक्यावर पांढरे डाग पडू शकतात. यासोबत केसांचा रंग बदलू शकतो. सुरूवातील कोळेभोर केस भूरकट व्हायला सरूवात होते आणि आजार बळावल्यानंतर केस पांढरे होतात.
3. विटिलिगो आजाराने पीडित व्यक्तीची त्वचा संवेदनशील होते. यामुळे उन्हाच्या संपर्कात येऊन त्रास होऊ शकतो.
4. हा आजार ताण-तणाव यामुळेही बळावू शकतो.
यासोबत टाईप-1 मधुमेही आणि थॉयरॉईड रूग्णांना हा आजार होऊ शकतो. यासोबत त्वचा गंभीररित्या जळाल्यामुळेही विटिलिगो आजार होऊ शकतो. विटिलिगो आजार 20 ते 30 वर्षाच्या तरूणांत जास्त प्रमाण असल्याचं समजतंय. हा आजारावर वेळीच नियंत्रण मिळवायचं असेल, तर संबंधित डॉक्टरांचा आधी सल्ला घ्या
टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्वाच्या बातम्या वाचा :