Vitamin C For Skin : चेहऱ्याचे सौंदर्य आणि नैसर्गिक चमक यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचं आहे. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी, आपण या जीवनसत्त्वांचा वापर अन्न, पेय आणि ज्यूसच्या स्वरूपात करू शकतो. हे एक दाहक-विरोधी पोषक आहे जे त्वचेचा टोन आणि पोत सुधारण्यासाठी, त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढण्यासाठी ओळखलं जातं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोक फक्त व्हिटॅमिन सी घटक असलेली मेकअप प्रोडक्ट्स वापरतात. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास काय समस्या उद्भवू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का?


व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या 


जखमा भरण्यासाठी लागणारा वेळ : व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे घाव बरी होणे हे आहे. खरं तर, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरात कोलेजन हळूहळू तयार होऊ लागते, ज्यामुळे जखम लवकर बरी होत नाही. त्याच्या कमतरतेमुळे, संसर्ग कमी होण्याऐवजी, ते पसरण्यास सुरूवात होते. 


चेहऱ्यावर सुरकुत्या येतात : व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा येण्याची समस्या वाढू लागते. जेव्हा शरीराला व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा त्वचेचा कोरडेपणा वाढतो आणि त्यामुळे कपाळावर, डोळ्यांभोवती आणि ओठांवर सुरकुत्या पडतात. आसपासच्या त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात.


रॅशेस येतात : त्वचेवर पुरळ उठणे हे देखील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. 


पिंपल्स येणे : चेहऱ्याच्या त्वचेत संसर्ग होणे आणि लवकर बरे न होणे हे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे लक्षण आहे. याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वारंवार होऊ शकते.


व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी 'ही' फळं खा 


संत्री : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते, संत्री दिसायला जशी चांगली असतात. त्याचप्रमाणे ते व्हिटॅमिन सीचाही चांगला स्रोत आहे.


आवळा : शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन देखील करू शकता. जर तुम्ही आवळा खाल्ला तर तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळेल.


किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जर आपण किवीबद्दल बोललो तर त्यात 137.4 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. यासोबतच त्यात पोटॅशियम, तांबे आणि लोह देखील चांगले असते. यासोबतच पपई, टोमॅटो, द्राक्षे, पेरू, लिंबू, स्ट्रॉबेरी, शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील आढळते. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करा.