World Stroke Day 2023 : आजकाल लोक आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडत आहेत. देशभरातील आणि जगभरातील अनेक लोक या समस्यांना सतत बळी पडत आहेत. स्ट्रोक ही या गंभीर समस्यांपैकी एक आहे, जी जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रक्ताशिवाय तुमच्या मेंदूच्या पेशी (Brain Cells) हळूहळू नाहीशा होऊ लागतात. यामुळे गंभीर लक्षणे, कायमचे अपंगत्व आणि मृत्यू देखील होऊ शकतो. स्ट्रोकचे एकापेक्षा जास्त प्रकार आहेत. स्ट्रोकचे मुख्य प्रकार, त्यांची लक्षणे आणि उपचार याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. 


स्ट्रोकचे किती प्रकार आहेत?


मेयो क्लिनिकच्या मते, स्ट्रोकचे तीन मुख्य प्रकार आहेत, ज्यात क्षणिक इस्केमिक स्ट्रोक, इस्केमिक स्ट्रोक आणि हेमोरेजिक स्ट्रोक यांचा समावेश आहे. 


इस्केमिक स्ट्रोक


हा स्ट्रोकचा सर्वात सामान्य प्रकार आहे. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो. अडथळा किंवा अरुंद झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होऊ लागतात, त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह लक्षणीयरीत्या कमी होतो. 


क्षणिक इस्केमिक हल्ला (Transient ischemic attack)


क्षणिक इस्केमिक अटॅक (TIA) याला मिनिस्ट्रोक देखील म्हणतात. तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाहात तात्पुरते अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट (TIA) ला कारणीभूत ठरते. ही लक्षणे थोड्या काळासाठीच टिकतात.


हेमोरेजिक स्ट्रोक


रक्तस्रावी स्ट्रोक मेंदूतील ब्लड वेसल लीक होते तेव्हा हेमोरेजिक स्ट्रोक होतो. मेंदूतील रक्तस्त्राव रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या अनेक परिस्थितींमुळे होऊ शकतो. हेमोरेजिक स्ट्रोकशी संबंधित घटकांमध्ये यांचा समावेश होतो. 


अनियंत्रित उच्च रक्तदाब


रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिवापर


ट्रॉमा (आघात)


इस्केमिक स्ट्रोकमुळे रक्तस्त्राव देखील होतो


स्ट्रोकची प्रमुख कारणे


उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब हे ब्रेन स्ट्रोकचे मुख्य कारण आहे.


अॅट्रियल फायब्रिलेशन : अनियमित हृदयाचा ठोका रक्ताच्या गुठळ्या आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो.


धूम्रपान आणि मद्यपान : बिघडलेली जीवनशैली तसेच मद्यपान-धूम्रपानाच्या सवयीमुळे देखील स्ट्रोकचा धोका वाढतो.


मधुमेह : उच्च रक्तातील साखरेची पातळी रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते.


कौटुंबिक इतिहास : स्ट्रोकचा कौटुंबिक इतिहास असल्यास त्याचा धोका वाढू शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी