तुम्हालाही वारंवार थकवा येतो का? अंगातील त्राण गळून पडल्यासारखे सतत वाटणे हे शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता असल्याचं लक्षण आहे. शरीराला ताकद देण्यासाठी या विटामिनची नितांत गरज असते. गरोदर महिलांना तर फॉलेट तसेच एक प्रकारचा विटामिन बी दिला जातो.शरीरातील ऊर्जा उत्पादनासाठी आणि चयापचय सुलभ करण्यासाठी विटामिन बी12 मदत करतात. लाल रक्तपेशींचा निर्मितीमध्ये याचा सर्वात मोठा वाटा आहे.
बी गटातील जीवनसत्व अन्नाचे उर्जेत रूपांतर करून मज्जा संस्था निरोगी करण्याचे काम करतो. लाल रक्तपेशींचे उत्पादन सुलभ करणे तसंच डीएनए आणि प्रथिनांच्या संश्लेषणात याची महत्त्वाची भूमिका आहे.
अशक्तपणासह पचनाच्याही समस्या वाढतात
ब जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे सारखा थकवा जाणवणे, अशक्तपणा, पचनाच्या समस्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी धोका वाढू शकतो. बी जीवनसत्त्वे हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आहेत जे शरीराच्या ऊर्जा उत्पादनासाठी आणि चयापचय प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण आहेत.बी-१२ ची कमतरता भासल्यास चक्कर येणं, कमकुवतपणा, त्वचा पिवळी पडणं. डोक्यात वेदना, डिप्रेशन आणि पचनाच्या संबंधित समस्या उद्भवतात.
शाकाहारात विटामिन बी 12 ची कमतरता
शाकाहारी लोकांमध्ये विटामिन बी 12 ची कमतरता असल्याचं सांगितलं जातं. पण शाकाहारातही काही पदार्थ आहेत ज्यांचा समावेश आहारात केल्यानं विटामिन बी ची कमतरता दूर होऊ शकते. ब जीवनसत्वांचा समृद्ध स्त्रोत हा मांसाहारात अधिक मिळतो. मासे, अंडी दुग्धजन्य पदार्थ, मांस यामध्ये विटामिन बी चा स्त्रोत अधिक असतो. परंतु हिरव्या पालेभाज्या बीन्स आणि मटार हे देखील बी जीवनसत्वाचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. याशिवाय तृणधान्ये यामध्येही मजबूत विटामिन बी मिळू शकते. अक्रोड हा विटामिन बी12 चा उत्तम स्त्रोत असल्याचे मानले जाते.
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी दूध हे सगळ्यात उत्तम ड्रिंक आहे. यामुळे नसा, हाडं आणि मेंदू चांगला राहतो. सोयाबीनमध्ये व्हिटामीन बी-१२ असते. आंबवलेले सोयाबीन ज्याला टम्पेह असेही म्हणतत यात व्हिटामीन -१२ चे प्रमाण जास्त असते.
ब जीवनसत्वाचे किती प्रकार आहेत?
थायमिन (B1),
रिबोफ्लेविन (B2),
नियासिन (B3),
पॅन्टोथेनिक ऍसिड (B5),
पायरिडॉक्सिन (B6),
बायोटिन (B7),
फोलेट (बी 9),
कोबालामिन (B12)