Winter Health Tips : सध्या हिवाळ्याचा (Winter) हंगाम सुरु आहे. गरम कपडे हळूहळू कपाटातून बाहेर येऊ लागले आहेत. सर्वजण ब्लँकेट आणि गोधडीचा वापर करताना दिसत आहेत. अनेकांना थंडीमध्ये थोंड झाकून झोपण्याची सवय (Sleeping Habits) असते. बहुतेक जण तोंडावर पांघरुन घेऊन झोपतात. तुमचीही अशी सवय असेल, तर हे थांबवा. नाहीतर तुम्हाला महागात पडू शकतं. तोंड झाकून झोपणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. गोधडी किंवा ब्लँकेटमध्ये चेहरा झाकून झोपल्याने गुदमरल्यासारखे होऊ शकते. होण्याची शक्यता असते. जेव्हा आपले तोंड झाकले जाते तेव्हा शरीराला ताजा ऑक्सिजन मिळत नाही आणि फक्त खराब ऑक्सिजन (Oxygen) शरीरात (Health Tips) जात राहतो. झोपण्याचे तोटे जाणून घ्या.


तोंड झाकून का झोपू नये? यामागचं कारण वाचा


1. फुफ्फुसांना इजा होऊ शकते


तोंड झाकून झोपल्याने योग्य प्रमाणात ऑक्सिजन शरीरात पोहोचत नाही. याचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे गुदमरणे किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक परिस्थिती उद्भवू शकतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये, फुफ्फुसे अगदी संकुचित होताना दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात तोंड झाकून झोपणे निषिद्ध असते.


2. चयापचय क्रियेवरही परिणाम


झोपताना तोंड झाकल्यावर आपल्या श्वासोच्छवासावर परिणाम होतो. श्वासोच्छवासादरम्यान शरीराला ताजा ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. पण, तोंडावर ब्लँकेट घेतल्याने श्वासोच्छवासासाठी खेळती हवा मिळत नाही. परिणाम कार्बन डायऑक्साईड युक्त खराब हवा फुफ्फुसात जाऊन रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे तोंड झाकून झोपल्याने चयापचय क्रियांवरही परिणाम होतो.


3. त्वचेच्या समस्या वाढू शक्यता


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात तोंड झाकून झोपल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. रजाई किंवा ब्लँकेटमध्ये असलेली खराब हवा त्वचा काळी पडू शकते. यामुळे त्वचेवर पुरळ देखील येऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, तोंड झाकून झोपल्यामुळे असे होत आहे याची लोकांना जाणीव नसते. त्यामुळे ही सवय त्वरित बदलली पाहिजे.


सर्वात जास्त धोका कोणाला?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दमा, सीओपीडी किंवा श्वसनाचे इतर कोणतेही आजार आहेत, असणाऱ्या व्यक्तींना तोंड झाकून झोपल्याचा जास्त धोका आहे. श्वसनासंबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी चुकूनही तोंड झाकून झोपू नये. अशा लोकांसाठी ही सवय जीवघेणेही ठरू शकते. दमा किंवा इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची फुफ्फुसे कमकुवत होतात, अशा परिस्थितीत तोंड झाकून झोपल्याने योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्याचबरोबर दम्याचा झटका किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी कधीही तोंड झाकून झोपू नये.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


New Year Resolution : नवीन वर्षाचा संकल्प करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा, नाहीतर होईल नुकसान