New Year 2024 Resolution : नवीन वर्षात (New Year 2024) स्वतःला सुधारण्यासाठी दरवर्षी आपण काही ना काही संकल्प (New Year Resolution) करतो. आपल्यात सुधारणा करण्यासाठी आणि वेळ सत्कारणी लावण्यासाठी आपण नव्या वर्षात संकल्प (New Year Goals) करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच प्रेरणा घेणून आपण मेहनत करतो. पण, अनेक वेळा आपण आपल्यासमोर असे संकल्प करतो ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास करावा लागतो. आपण संकल्प (New Year 2024 Resolution) करतो, पण नंतर ते पूर्ण झाले नाही की आपलं मानसिक खच्चीकरण होऊन मानसिक समस्या सतावण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन वर्षात असे संकल्प घेणं टाळावं. नववर्षाचा संकल्प करताना (New Year 2024 Goals) कोणत्या गोष्टींचा समावेश करू नये हे जाणून घ्या.


नवीन वर्षाचा संकल्प करताय?


आपण दरवर्षी नवीन वर्षात काही ना काही संकल्प करतो. नवीन वर्षात आपल्याला काही नवीन सवयी अंगीकारायच्या आहेत किंवा आपल्या जीवनात काही बदल करायचे असतील, तर अशा गोष्टी किंवा सवयींचा आपण संकल्प करतो. अनेक वेळा आपण काही उद्दिष्टे ठरवून नवीन वर्षाचा संकल्प करतो, पण ती पूर्ण करणं खूप कठीण असतं आणि यामुळे वर्षाच्या शेवटी ही बाब आपल्या लक्षात येते आणि आपण निराश होतो. अशा अपूर्ण संकल्प आणि उद्दिष्टांमुळए आपलं मनोबल कमकुवत करू शकतात. त्यामुळे त्यांना तुमच्या नववर्षाच्या संकल्पाचा भाग बनवू नये. यामुळे नवीन वर्षात कोणते संकल्प करू नसेत, ते जाणून घ्या.


वाईट सवय सोडण्याचा संकल्प


नवीन वर्षात बहुतेक जण वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात. 
धुम्रपान, मद्यपान किंवा जास्त जंक फूड खाणे यासारख्या अनेक वाईट सवयी आहेत, ज्यांना लोक सोडून देण्याचा निर्णय घेतात पण ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे एखादी वाईट सवय सोडण्याऐवजी तिच्या जागी नवीन सवय लावण्याचा संकल्प अधिक फायदेशीर ठरू शकतो. बाहेरचं जंक फूड खाणे सोडण्याऐवजी सकस आणि योग्य आहार घेण्याचा संकल्प तुम्ही नवीन वर्षात करु शकता. त्याशिवाय धुम्रपान, मद्यपान यासारख्या वाईट सवयी सोडण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी आणि नंतर संकल्प करावा. असे केल्यास तुमचा संकल्प पूर्ण होण्याची शक्यता जास्त असेल.


वजन कमी करण्याचा संकल्प


वजन कमी करणे हा तुमच्या संकल्पाचा भाग बनवून तुम्ही स्वतःवर खूप दबाव टाकता. यामुळे, तुम्ही शॉर्ट कट्सच्या मदतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करता, सामान्यतः आहार, जे उलट होऊ शकते. त्यामुळे वजन कमी करण्याऐवजी निरोगी राहणे हा तुमच्या संकल्पाचा एक भाग बनवा.


रिलेशनशिप


काही जण नवीन वर्षात रिलेशनशिपमध्ये पडण्याचा संकल्प करतात. प्रेम संबंध जोडणे हा खूप सुंदर अनुभव असू शकतो, पण असा संकल्प करु नये. नात्यातील दबावामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवीन वर्षात याला तुमच्या संकल्पाचा भाग बनवू नका.


प्रत्येक कार्यात यश मिळवण्याचा संकल्प


अनेकदा आपण नववर्षाच्या उत्साहात असतो, त्यामुळे या वर्षात आपण जे काही करू, त्या सर्वांमध्ये आपण यशस्वी होऊ असा आपला संकल्प किंवा अपेक्षा असू शकते. या संकल्पामुळे तुम्ही स्वतःवर अनावश्यक दबाव टाकता. हे करणं भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे नवीन वर्षात प्रत्येक कार्यात यश मिळवण्याचा संकल्प करण्याची चूक करू नका.