Sneezing : सर्दी किंवा खोकल्यावर शिंका येणे अगदी सामान्य आहे. पण, अनेकदा लोकांना खूप शिंका येतात, त्यामुळे ते अस्वस्थ होतात. सर्दी नसतानाही कधी कधी शिंक येत असली तरी अनेकदा एका शिंकानंतर लगेच दुसरी शिंक येते. अशा परिस्थितीत बरेच लोक शिंकण्यापासून स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की असे करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते? ते कसे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


लोक अनेकदा शिंकणे टाळतात


खरं तर, काही लोकांना ऑफिसमध्ये किंवा लोकांसमोर मोठ्याने शिंकायचे नसते, म्हणूनच ते अनेकदा शिंक थांबवतात. कोरोना महामारीच्या काळात ही समस्या आणखीनच वाढली होती, जेव्हा सामान्यपणे एखाद्याला शिंक येते तेव्हा लोक त्यांच्याकडे एकटक पाहायचे णि लांब अंतर राखायचे. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या शिंका थांबवणे चांगले मानले. 


तुम्ही शिंका थांबवता तेव्हा काय होते?


आता शिंकणे थांबवणे धोकादायक का असू शकते आणि डॉक्टर प्रत्येक वेळी असे न करण्याचा सल्ला का देतात याबद्दल जाणून घेऊयात. खरंतर, जेव्हा आपण खोकला किंवा शिंकणे थांबवतो तेव्हा शरीरावर तसेच फुफ्फुसांवर दबाव येतो. अशा परिस्थितीत एखाद्याला शिंका येणे थांबवले तर हा दाब 10 पटीने वाढतो. अशा स्थितीत शरीराच्या कमकुवत भागांवर दाब पडल्याने त्रास होऊ शकतो. याचा परिणाम कान आणि डोळ्यांवरही होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक वेळी शिंकणे किंवा खोकला थांबवणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच जर तुम्हाला शिंक येत असेल तर तुम्ही रुमाल किंवा रूमाल नसल्यास टिश्यू पेपरवर शिंकू शकता. 


डॉक्टर म्हणतात की निरोगी व्यक्तीचे शरीर इतके दबाव सहन करण्यास तयार असते. पण, ज्यांचे शरीर कमकुवत आहे समस्या अशा लोकांना होऊ शकते. विशेषत: दारू किंवा सिगारेट ओढणाऱ्या लोकांसाठी शिंक थांबवणे धोकादायक ठरू शकते. कारण असे केल्याने  श्वसनमार्गावर किंवा फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत शरीराच्या कमकुवत भागांवर दाब पडल्याने त्रास होऊ शकतो. याचा परिणाम कान आणि डोळ्यांवरही होऊ शकतो. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : हिवाळ्यात काय जास्त फायदेशीर आहे, तूप की लोणी? रोज किती प्रमाणात खावे हे तज्ञांकडून जाणून घ्या