Winter Health Tips : वातावरणात बदल झाले की त्याचे परिणाम शरीरावर देखील होऊ लागतात. थंडीच्या दिवसांत तर शरीरात असे बदल नेहमी जाणवतात. अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारखे आजार होणे हे स्वाभाविक लक्षण आहे. जरी हे आजार जास्त काळ टिकणारे नसले तरी या दिवसांत मात्र आपले शरीर पूर्णपणे कोमेजून जाते. थकवा जाणवतो. सर्दी, खोकल्यासाठी अनेकजण अॅलोपथीच्या औषधांचा वापर करतात. तर काही जण घरगुती उपायांनी हा आजार बरा करतात.   


घरगुती उपायांनी आजार कशा प्रकारे बरा केला जाऊ शकतो याच्या काही सोप्या टिप्स आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. य टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच थंडीत होण्यार्या आजारांपासून स्वत:चे संरक्षण करू शकता. हे घरगुती उपाय कोणते ते जाणून घ्या.      


सर्दी आणि खोकल्यासाठी आयुर्वेदिक उपाय : 


जर तुम्हाला विषाणू आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद टाकून ते चांगले उकळून घ्या, त्यानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. असे केल्याने संसर्गही निघून जाईल.


त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि आले पावडर, काळी मिरी पावडर आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन करा. लवकरच कफपासून तुमची सुटका होईल. 


2 ग्लास पाण्यात 5 ते 10 तुळशीची पाने, 5 ते 7 पुदिन्याची पाने, एक चमचा कॅरम दाणे, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा हळद घेऊन मध्यम आचेवर 10 मिनिटे उकळा. मग त्याचे सेवन करा आणि पहा तुम्हाला त्वरित आराम कसा मिळतो.


रात्री खूप खोकला होत असेल तर झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.


मधाबरोबर लिंबूचे सेवन केल्याने रात्री होणाऱ्या खोकल्यापासूनही आराम मिळतो. मात्र, ही पद्धत लहान मुलांवर करून बघू नका. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :


Winter Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फॉलो करा 'या' गोष्टी; मिळतील अनेक फायदे