Home Remedy For Dry Lips : हिवाळा येताच चेहऱ्याची चमक कमी होते. त्वचा कोरडी आणि निर्जीव होत असते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीचा परिणाम चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्वाधिक दिसून येतो. हिवाळ्यात, बहुतेक लोकांना फाटलेले ओठ आणि कोरड्या त्वचेचा त्रास होतो.


कोरड्या ओठांमुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. काहींचे ओठ खूप कोरडे होतात त्यामुळे ओठांच्या आजूबाजूची त्वचाही कोरडी होते. हिवाळ्यात ओठ कोरडे होत असतील तर घरगुती उपायांचा अवलंब करता येतो. 


फाटलेल्या ओठांवर करा 'हे' घरगुती उपाय
बदामाचे तेल- हिवाळ्यात झोपण्यापूर्वी दररोज ओठांना बदामाचे तेल लावा. ओठांना तेल लावल्यानंतर 5 मिनिटे मसाज करा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.


खोबरेल तेल- फाटलेले ओठ बरे करण्यासाठी दररोज नारळ तेलाचा वापर करा. दिवसातून 2-3 वेळा खोबरेल तेल लावा. यामुळे ओठांची त्वचा मऊ होईल आणि ओठांच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल.


क्रीम लावा- फाटलेल्या ओठांवर क्रीम लावणे खूप फायदेशीर आहे. रोज झोपण्यापूर्वी ओठांवर क्रीम लावा आणि थोडा वेळ मसाज करा. यामुळे फाटलेले ओठ खूप मऊ होतील.


मध लावा- फाटलेले ओठ बरे करण्यासाठी मधाचा वापर करा. यामुळे ओठ मऊ होतात आणि ओठांना पडलेल्या भेगाही कमी होतात. 


या गोष्टी लक्षात ठेवा- हिवाळ्यात खूप थंड किंवा गरम पाण्याने चेहरा वारंवार धुवू नका. ओठांच्या सभोवतालची त्वचा स्वच्छ ठेवा आणि त्वचेला योग्य मॉइश्चरायझ करा. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम वापरा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Health Tips : कोरोना काळात रिकाम्या पोटी खा 'हे' पदार्थ, Immunity होईल मजबूत


आधी कोरोना.. मग डेल्टा, आता ओमायक्रॉन; आणखी गंभीर रुपं घेणार कोरोना, तज्ज्ञांचा दावा


Protein Benefits : वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला मजबूत करण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha