Covid-19 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासठी शरीराची इम्युनिटी मजबूत असणे काळाची गरज झाली आहे. शरीराची इम्युनिटी कमी झाली तर वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी शरीरासाठी आणि इम्युनिटी वाढविण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काही हेल्दी पदार्थ खावेत. आपल्यापैकी कित्येकांना सकाळ-सकाळ चहा पिण्याची सवय असते. पण, यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. तुमची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा


गरम पाण्यात मध टाकून पाणी प्या :
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत होते. गरम पाण्यात मध टाकलेले पाणी प्यायल्याने तुमची पचनशक्तीसुद्धा चांगली राहते. तसेच, घशाचे विकार होत नाहीत. रिकाम्या पोटी मध घातलेले गरम पाणी प्यायल्याने तुमची स्किनमध्येही ओलावा टिकून राहतो.


तुळस-अद्रकचे पाणी प्या :
हिवाळ्यात तुळस आणि अद्रक गरम पाण्यात मिक्स केलेले पाणी प्यायल्याने  तुमची प्रकृती चांगली राहते. यामध्ये सामाविष्ट असलेले तत्व शरीराची इम्युनिटी वाढविण्यासाठी मदत करतात. अद्रकमध्ये व्हिटामिन सी असते. तर तुलशीत व्हिटामिन सी आणि कॅल्शियम असतात. 


ओट्सचे जाडे भरडे पीठ खाण्याचे फायदे :
जर तुम्ही रिकाम्या पोटी चांगला पोटभर नाश्ता करू इच्छिता तर तुम्ही रोज ओट्सचे भरडे खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन यांसारखे पोषक तत्व सामाविष्ट आहेत. यामुळे तुमची इम्युनिटी लवकर वाढेल. 



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha