Makar Sankranti 2024 : मकर सक्रांतीला (Makar Sankranti) सर्वजण तिळगूळ (Tilgul) खाण्याचा आणि पतंग (Kite) उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. पण, ही पद्धत नेमकी कशी सुरु झाली, हे तुम्हाला माहित आहे का, नसेल तर जाणून घ्या. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मकर संक्रांती हा पौष महिन्यातील शेवटचा सण आहे. या सणानंतर थंडी कमी होऊ लागते. म्हणजे वसंत ऋतु सुरू होतो. यंदा 15 जानेवारीला मकर सक्रांत आहे.


मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा


हिंदू दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती हा पौष महिन्यातील शेवटचा सण आहे. या सणानंतर थंडी कमी होऊ लागते आणि वसंत ऋतूला सुरुवात होते. मकर संक्रांतीचा सण यंदा 15 जानेवारीला आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळेच याला मकर संक्रांत म्हणतात. (Makar Sankrantila Patang ka Udvatat)


मकर संक्रांतीला पतंग का उडवतात?


मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. लोक छतावर आणि मैदानावर रंगीबेरंगी पतंग उडवताना दिसतात. मकर संक्रांत आणि पतंग उडवणे याचा एकमेकांशी काय संबंध आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? पतंग उडवण्याच्या परंपरेमागे उत्तम आरोग्याचं रहस्य दडलेलं असल्याचं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून या दिवशीची सूर्यकिरणे शरीरासाठी अमृताप्रमाणे असतात, ही सूर्यकिरणे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे या दिवशीचा सर्यप्रकाश घेणे, खूप लाभदायी ठरते.


अनेक आजारांवर गुणकारी


थंडीच्या काळात खोकला, सर्दी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो. मकर संक्रांतीच्या दिवशीची किरणे शरीरासाठी औषधाचं काम करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने शरीर सूर्याच्या किरणांच्या संपर्कात राहते आणि याचा शरीराला फायदा होतो. 


पंतग उडवण्याची सुरुवात कशी झाली?


मान्यतेनुसार, त्रेतायुगातील मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्रीरामाने आपल्या भावांसह आणि हनुमानासह पतंग उडवले. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी स्नान, पूजा आणि दान यांचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी मकर संक्रांत रुहानी नक्षत्रात सुरू होत आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ मानलं जातं. याशिवाय ब्रह्मयोग आणि आनंदादी योग तयार होत आहेत, जे फलदायी मानले जातात.