Lungs Infection Symptoms : वातावरण बदलांचा आरोग्यावर परिणाम होताना पाहायला मिळतं. हिवाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. या मोसमात श्वसनाचे आजार अधिक पसरतात. हिवाळ्यात हवामानाचा फुफ्फुसांवर (Lungs) सर्वाधिक परिणाम होतो. जर तुम्हाला तीव्र सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर ही तुमची फुफ्फुसे कमकुवत झाल्याची लक्षणे असू शकतात. याशिवाय फुफ्फुसांना संसर्ग (Lung Infection) झाल्याचा इशारा असू शकतो. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास घातक ठरतात. याचं कारण आणि ते टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेच हे जाणून घेणं गरजेचं आहे. 


फुफ्फुसाचं आरोग्य महत्त्वाचं


फुफ्फुसाचं (Lungs) सर्वात मोठं कार्य म्हणजे शरीरात रोग पसरवणाऱ्या जीवाणूंपासून (Bacteria) शरीराचे संरक्षण करणे. ऑक्सिजन देखील प्रथम फुफ्फुसात पोहोचतो. आपल्या शरीराचे पीएच संतुलन फुफ्फुसाद्वारे राखलं जातं. त्यामुळे आपल्या शरीरात फुफ्फुसांना खूप महत्त्व आहे.  


छातीत दुखणे


अधूनमधून छातीत दुखणे सामान्य बाब आहे. सतत छातीत दुखण्याचा त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. हे लक्षण एका महिन्यापेक्षा जास्त वेळ जाणवत असेल तर, ते गंभीर आजाराचं लक्षण आहे.


दीर्घकाळ खोकला


दीर्घकाळ आणि तीव्र खोकला असल्यास हे फुफ्फुसांच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं.  तीव्र खोकला होतो, तेव्हा छातीत तीव्र वेदना सतत जाणवते आणि ही परिस्थिती सतत आठ आठवडे चालू राहते. हे फुफ्फुसाच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं.


धाप लागणे


जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि श्वासोच्छवासाची समस्या दीर्घकाळ चालू राहिली तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.


श्वास घेण्यास त्रास होणे


जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ही श्वासोच्छवासाची समस्या दीर्घकाळ चालू राहिली तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. हे फुफ्फुसांच्या संसर्गाचं लक्षणं असू शकतं.


क्रोनिक कफ


फुफ्फुसामध्ये क्रोनिक कफ तयार होतो, त्यामुळे फुफ्फुसावर बाहेरील बॅक्टेरियाचा हल्ला होण्यापासून बचाव होतो. जर क्रोनिक जास्त प्रमाणात तयार होऊ लागले तर ते फुफ्फुसाच्या आजाराचं लक्षण ठरू शकतं.


खोकताना रक्त येणे


खोकताना रक्त येणे हे गंभीर रोगाचं लक्षण आहे. हे लक्षण दिसल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळीच उपचार करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Corona JN.1 Variant : धोक्याची घंटा! JN.1 चा वाढता प्रसार भविष्यासाठी घातक, 40 हून अधिक देशांमध्ये पसरला नवीन व्हेरियंट