Alcohol Blackout: अल्कोहोल (Alcohol) म्हणजेच, मद्यपान करणं आरोग्यासाठी घातक ठरतं. अल्कोहोलच्या (Alcoholism) अतिसेवनानं आरोग्याची हानी तर होतेच, शिवाय खिशालाही कात्री लागते. साहित्य, सिनेमा, समाज सर्वत्र दारू किती घातक आहे, याची जिवंत उदाहरणं मांडली जातात. सुखात, दुखःत दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय का? दारू प्यायल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं? दारू प्यायल्यावर माणूस आपलं संपूर्ण देहभान कसा काय विसरतो? 


दारू पिणारे अनेकदा आपलं भान गमावतात, त्यांना काही आठवत नाही आणि नशेत असताना बडबडणं, हसणं किंवा रडणं यांसारखे प्रकार सुरू होतात. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोल ॲब्युज अँड अल्कोहोलिझमच्या अहवालानुसार, नशेत असताना लोक असे का करतात? हे सांगण्यात आलं आहे.


दारू प्यायल्यानंतर शरीरात नेमका काय बदल होतो? अल्कोहोल ब्लॅकआउट म्हणजे काय? जाणून घेऊयात सविस्तर... 


दारू मेंदूचा ताबा घेते? 


हेडलबर्ग विद्यापीठातील संशोधक हेल्मुट जॉइंट्स यांनी त्यांच्या संशोधनातून स्पष्ट केलं आहे की, वाईनमध्ये असलेलं इथेनॉल हे अल्कोहोलचा अत्यंत लहान रेणू आहे. जो शरीरात प्रवेश करताच पाण्यात आणि रक्तात सहज विरघळतो. मानवी शरीरात 70-80 टक्के पाणी असल्यानं तो थेट शरीरातून मेंदूपर्यंत पोहोचतो.


मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि त्यानंतर व्यक्तीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते आणि गोष्टी लक्षात राहत नाहीत. व्यक्ती विचित्र वागते. काही वेळातच ती व्यक्ती दारूच्या नशेचा बळी ठरते.


अल्कोहोल ब्लॅकआउट म्हणजे काय? (What Is Alcohol Blackout?)


अल्कोहोलचा मेंदूवर थेट परिणाम होतो, अल्कोहोलमध्ये असलेली रसायनं मेंदूवर वर्चस्व गाजवतात. जास्त दारू प्यायल्यानंतर तुमचा मेंदू तुमच्या सभोवतालचं वातावरण समजू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, मद्यपान केल्यामुळे तुमची लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमकुवत होऊ लागते.


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोहोलिझमच्या एका प्रयोगात, 1000 लोकांवर संशोधन केलं गेलं, ज्यामध्ये दोन तृतीयांश लोकांना अल्कोहोल प्यायल्यानंतर ब्लॅकआउट झाल्याचं जाणवलं. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच, मद्य, अल्कोहोल प्राशन करणं हे आरोग्यास हानीकारक आहे. ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्यसेवनाला पाठिंबा अथवा त्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Liver Cancer: लिव्हर कॅन्सर, पुरुषांमधील पाचव्या, तर स्त्रियांमध्ये नवव्या क्रमांकाचा जीवघेणा कर्करोग; लक्षणं अन् उपचार काय?