Home Remedy For Constipation: धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि चुकीची आहारपद्धती (Wrong Diet) यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेकांमध्ये आढळणारी समस्या म्हणजे, बद्धकोष्ठ (Constipation). सध्या अनेक लोक या समस्येनं हैराण आहेत. चुकीची आहरपद्धती, वेळी अवेळी खाणं यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. बद्धकोष्ठतेमुळे सकाळी पोट साफ होत नाही. त्यामुळे अनेकांना गॅस (Gas), पोट फुगणं (Flatulence), पोटदुखी (Abdominal Pain) अशा समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठता (Constipation Problems) दीर्घकाळ राहिल्यास अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. 


बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी लोक विविध प्रकारची बाजारात मिळणारी औषधं, पेय यांचं सेवन करतात. परंतु त्यांचा प्रभाव तोपर्यंतच टिकतो, जोपर्यंत तुम्ही त्यांचं नियमित सेवन करत राहाल. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांनी बद्धकोष्ठता दूर केली जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवू शकता... 


बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पाण्यातून हे दोन पदार्थ घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं... जाणून घ्या कोणते? 


बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सकाळी अनोशापोटी पाण्यात चिया सीड्स आणि लिंबाचा रस एकत्र करुन पिऊ शकता. हे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक आहे, यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरू शकतं. 


चिया सीड्समध्ये शरीराला फायदेशीर ठरणारं फायबर मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत मदत होते. तसेच, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतं. लिंबाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. याचं नियमित सेवन केल्यानं बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटी यासारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. 


कसं कराल सेवन? (How To Consume?)


जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रस्त असाल, तर एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या. त्यात एक चमचा चिया सीड्स घ्या आणि त्यामध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर यामध्ये एक लिंबाचा रस व्यवस्थित एकत्र करा. तुम्ही यामध्ये थोडी मधही घालू शकता. दररोज सकाळी अनोशापोटी या ड्रिंकचं सेवन करा, यामुळे तुमची पोटाची समस्या दूर होईल आणि बद्धकोष्ठतेपासूनही तुम्हाला सुटका मिळेल. यामुळे आतड्याची हालचाल सुधारते, ज्यामुळे पोट सहज साफ होतं. एवढंच नाही तर, त्याचे नियमित सेवन केल्यानं इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतात.


बद्धकोष्ठता असल्यास चिया सीड्स आणि लिंबू पाण्यात मिसळून सेवन करणं खूप फायदेशीर ठरते. दरम्यान, जर तुम्हाला बऱ्याच काळापासून बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर कोणत्याही घरगुती उपायावर अवलंबून न राहात, डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weight Loss Food: झटपट वजन कमी करायचं असेल, तर 'हे' पदार्थ खा; बर्फासारखी वितळेल पोटावरील चरबी!