Weight Loss: आजकालची बदलती जीवनशैली, खाण्याच्या अयोग्य पद्धती, कामाचा ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध गंभीर आजार अनेकांना होत आहेत. यापैकी लठ्ठपणा हा असा एक गंभीर आजार आहे. ज्याच्या प्रभावाखाली आजकाल अनेकजण येतायत. तसं पाहायला गेलं तर, वजन वाढवणे जितके सोपे आहे, तितकेच ते कमी करणेही अवघड आहे. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु आपण नेहमी कमी वेळेत अधिक फायदे शोधत असतो. आज आम्ही तुम्हाला फिटनेस ट्रेनर्सनी दिलेल्या 5 सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सहज वजन कमी करू शकता.


वजन कमी करणे अवघड, पण अशक्य नाही..!


वजन कमी करणे अवघड काम आहे, पण अशक्य नाही. वजन वाढवण्यासाठी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो पण ते कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. वजन वाढण्याची कारणे म्हणजे चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी जसे की खराब आहार, ताण, अति मद्यपान किंवा झोप न लागणे. जास्त वजनामुळे आपले शरीर शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय राहते, ज्यामुळे अनेक रोगांचा धोकाही वाढतो. जास्त वजनामुळे चयापचय मंदावतो आणि शरीरात हार्मोनल असंतुलन होते. वजन कमी करण्यासाठी फिटनेस तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या..


फिटनेस ट्रेनर काय म्हणतात?


महाराष्ट्रातील फिटनेस ट्रेनर, साकेत गोखला यांनी एका पॉडकास्ट शोमध्ये सांगितले की, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज काही महत्त्वाच्या गोष्टींचं नियमित पालन करणे. वजन कमी करण्यासाठी त्यांनी काही खास टिप्स लोकांसोबत शेअर केल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत.


वजन कमी करण्यासाठी 5 सोप्या टिप्स


साखरयुक्त पेये टाळा - साखरयुक्त पेये, मिठाई आणि स्नॅक्स घरी ठेवणे टाळा. हे ठेवल्याने जंकफूड खाण्याची लालसा वाढेल. या पेयांमध्ये जास्त साखर असते, ज्यामुळे कॅलरीज वाढते. त्यामुळे ही पेये पिऊ नयेत म्हणून ती घरी ठेवू नका.


अन्नाची योग्य निवड - साकेत सांगतो की, आपण जे खातो ते वजन कमी करण्यास मदत करते. योग्य आहार घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या फूड प्लेटमध्ये प्रथिने सर्वाधिक ठेवा.


ड्राय डाएट- याचा अर्थ असा होतो की दररोज योग्य प्रमाणात प्रथिनेयुक्त पदार्थ घेणे आवश्यक आहे. अंडी, चीज आणि चिकन खा. तुमच्या आहारात 50-60% प्रथिनांचा वापर ठेवा, त्यानंतर कर्बोदके आणि लॉ फॅट्सचे सेवन करा.



खाण्याची वेळ - साकेत सांगतो की, वजन कमी करण्यासाठी, आपल्यासाठी दिवसातून दोनदा योग्य आणि वेळेवर खाणे खूप महत्वाचे आहे. या दोन्ही वेळी बाहेरचे अन्न खाऊ नये.


योग्य लोकांशी कनेक्ट व्हा - सोशल मीडियाच्या मदतीने, चांगल्या लोकांशी कनेक्ट व्हा, जे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी दर्जेदार टिप्स देऊ शकतात. चांगल्या इंफ्लुएंसर्सना फॉलो करा. जेणेकरून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतील. 


हेही वाचा>>>


Cancer: Smartwatch प्रेमींनो लक्ष द्या! स्मार्ट घड्याळातून वाढतोय कर्करोगाचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब समोर


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )