Cancer: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाने देखील मोठी प्रगती केली आहे. अनेक कंपन्या विविध प्रकारचे गॅजेट्स बाजारात आणत आहेत. जे लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्यापैकीच एक म्हणजे स्मार्टवॉच किंवा फिटनेस बॅंड.. अनेकजण आजकाल विविध प्रकारचे स्मार्टवॉचचा वापर करतात. तुम्ही देखील स्मार्ट घड्याळ किंवा फिटनेस बँड वापरत असाल तर त्याचे तोटे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. चांगल्या ब्रँडच्या स्मार्ट घड्याळांमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नेमकं काय म्हटलंय या संशोधनात? जाणून घ्या..


स्मार्ट घड्याळं ठरतायत जीवघेणी?


नोट्रे डेम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की ब्रँडेड घड्याळांमध्ये हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. फिटनेस वॉच बँडमध्ये फ्लोरोइलास्टोमर्स, एक प्रकारचा सिंथेटिक रबर असतो जो त्वचेचे तेल आणि घाम यांच्याशी जोडल्यास कर्करोग होऊ शकतो. गार्डियनने अहवाल दिला आहे की, एका ब्रँडने पीएफएएससाठी सकारात्मक चाचणी केली आहे. यामध्ये Nike, Apple, Fitbit आणि Google च्या घड्याळांची चाचणी घेण्यात आली. अभ्यासात विविध PFAS संयुगे तपासण्यात आले,  ज्यामध्ये PFHxA चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले, जे एक कृत्रिम रसायन आहे. हा PFAS गटाचा भाग आहे, जो 40 टक्के बँडमध्ये आढळतो. हे रसायन सामान्यतः कपडे, चटई, कागद आणि कीटकनाशकांवर वापरले जाते, यामुळे यकृताच्या आजाराचा धोका असतो.


मानवांसाठी अधिक धोकादायक? 


अहवालात पुढे म्हटले आहे की, या कंपाऊंडवर फार कमी संशोधन झाले आहे. हे इतर प्रकारच्या पीएफएएसपेक्षा मानवांसाठी अधिक धोकादायक मानले जाते. संशोधक प्रेस्ली यांनी सांगितले की, त्यांच्या निकालात जे समोर आले ते चिंताजनक आहे. युरोपियन युनियनने वॉच बँडवर PFHxA ला बंदी घालण्याचाही प्रस्ताव दिला आहे.


फॉरएव्हर केमिकल्स म्हणजे काय?


फॉरेव्हर केमिकल्स म्हणजे Per आणि Polyfluoro Alkyl (PFAS) आणि त्यांना फॉरेव्हर केमिकल्स असे म्हटले जाते, कारण ते खूप स्थिर असतात, जे निसर्गात सहजपणे मोडत नाहीत आणि कर्करोगाचा धोका निर्माण करतात. याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत करतात.


हेही वाचा>>>


पनीर, चीज आणि भात खाल्ल्याने खरंच Guillain Barre Syndrome होऊ शकतो? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )