Weight Loss: आजकालची बदलती जीवनशैली आणि मोबाईलच्या युगात माणसाला स्वत:ला वेळ द्यायला जमत नाही. कामाचा ताण, अनेक जबाबदाऱ्यांमुळे वैयक्तिक आयुष्य अगदी शून्य झाल्यासारखे वाटू लागले आहे. यासारख्या अनेक गोष्टींमुळे व्यक्तीला अनेक शारिरीक आणि मानसिक व्याधींनी ग्रासलंय. म्हणूनच माणसाला निरोगी राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी पोषण आणि शारीरिक हालचालींचीही गरज असते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी चालणे हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि नियम माहित असतील किंवा त्यांचे पालन केले असेल. आज आम्ही तुम्हाला चालण्याचा नियम 6.6.6 बद्दल सांगत आहोत, जो चालण्याचा एक नवीन पर्याय आहे. या नियमाचे अनेक फायदे आहेत, हा नियम आणि त्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया.


6.6.6 चालण्याचा नियम काय आहे?


6.6.6 चालण्याचा नियम चालण्याचा एक विशेष मार्ग आहे, जो तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सुचवण्यात आला आहे. यामध्ये चालणे दोन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते.


6 मिनिटे चालणे- यामध्ये तुम्हाला दर तासाला किमान 6 मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. ही पद्धत अशा लोकांसाठी आहे, जे बराच वेळ बसतात, यात ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. अशा प्रकारे नियमित चालण्याने शरीर क्रियाशील राहते आणि रक्ताभिसरणही सुधारते. ही सर्वात सामान्य पद्धत आहे, जर तुम्ही आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असाल आणि अधिक फायदे हवे असतील, तर तुम्ही दुसरी पद्धत ट्राय करून पाहू शकता. या पद्धतीमध्ये तुम्हाला सकाळपासूनच तुमच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामध्ये तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा चालावे लागेल. याचा नियम म्हणजे दिवसभरात फक्त 60 मिनिटे चालावे लागते.


सकाळचा नियम


यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सकाळी 6 वाजण्यापूर्वी उठायचे आहे आणि त्यानंतर 6 मिनिटांचा वॉर्मअप करायचा आहे. मग तुम्हाला 6 मिनिटे शरीर थंड करावे लागेल. आता यानंतर तुम्हाला 30 मिनिटे सतत चालावे लागेल. मॉर्निंग वॉकमुळे शरीरातील चयापचय क्रिया मजबूत होते. आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. सकाळी चालण्याने कार्डिओच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. मॉर्निंग वॉकमुळे रक्तदाबही स्थिर राहतो.


संध्याकाळचा नियम


आता तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता पुढची 30 मिनिटे चालायला जायचे आहे. यामध्ये 6-6 मिनिटांचे वॉर्म-अप आणि कूल डाउन सेशन देखील समाविष्ट आहे. संध्याकाळी चालण्याने मानसिक आरोग्य सुधारते. तणाव कमी होतो आणि रात्री झोप चांगली लागते.


6.6.6 चालण्याच्या नियमाचे फायदे 



  • रक्ताभिसरण मध्ये सुधारणा.

  • स्नायू मजबूत होतात.

  • लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त.

  • मानसिक आरोग्य सुधारणे.

  • हृदयाचे आरोग्य चांगले.

  • पाठ आणि सांधेदुखीतही आराम


हेही वाचा>>>


Health: अजबच.. Red Wine प्यायल्याने कर्करोगाचा धोका होतो कमी? काय आहे सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )