Weight Loss: आजकाल बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या अयोग्य वेळा अशा अनेक गोष्टींमुळे अनेकजण विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. तर बहुतेक लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे तुमच्या शरीराचा आकारच खराब होत नाही, तर अनेक आजारही होतात. अनेकांना मधुमेह, रक्तदाब किंवा थायरॉईड हे असे आजार होत आहेत, ज्यासाठी लठ्ठपणाही जबाबदार मानला जातोय. लठ्ठपणावर नियंत्रण न ठेवल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी वजन कमी करण्यासाठी एक खात्रीशीर उपाय सांगितला आहे. यासाठी तुम्हाला एक अतिशय साधे काम करावे लागेल. यासाठी ना तुम्हाला जास्त व्यायाम करावा लागेल, ना जिमला जावे लागेल. जाणून घ्या....


 


वजन कमी करण्यासाठी 'ही' पानं औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण


जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय शोधत असाल, तर तुम्ही काही खास पानांचे सेवन करावे. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, अश्वगंधाची पाने औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. यामुळे शरीरातील अशक्तपणा तर दूर होतोच, शिवाय शरीराला प्रचंड ताकदही मिळते.


 


लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'या' गोष्टी करा


आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, लोक सहसा अश्वगंधा मूळ स्वरूपात वापरतात, परंतु तुम्हाला माहित आहे का? की या वनस्पतीची पानx देखील खूप प्रभावी आहेत. जर तुम्ही अश्वगंधाची फक्त 3 पाने कुस्करून कोमट पाण्यासोबत सेवन केलीत, तर तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.


 


अश्वगंधाचा फायदा काय?


अश्वगंधा ही एक अशी वनस्पती आहे. जी संपूर्ण शरीराला रोगांशी लढण्यासाठी शक्ती देते. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आजारी पडण्याचा धोका टळतो. या पानांचे रोज सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.



वजन कमी करण्यासाठी काय खावे?


त्याची पाने सकाळी, एक दुपारी आणि एक रात्री खावीत असे बाळकृष्ण यांनी सांगितले. दिवसातून अश्वगंधाची तीन पाने खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. यासोबतच वजन कमी करण्यासाठी प्राणायामही करा. सकस आहार घ्या.


 


 


हेही वाचा>>>


Fitness Tips: वयाच्या 66 व्या वर्षीही आलियाची सासू दिसते 'फिट अन् सुंदर! रहस्य जाणून घ्यायचंय? फॉलो करा त्यांच्या 'या' फिटनेस टिप्स


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )