How to Treat PCOS Naturally : अलिकडच्या काळात महिलांमध्ये पीसीओएस (PCOS) चं प्रमाण वाढताना दिसत आहे. यामागे  व्यस्त जीवनशैली, ताणतणाव, योग्य आहाराचा अभाव अशी अनेक कारणे आहेत. जगभरातील सुमारे 10 टक्के महिला पीसीओएसच्या समस्येने त्रस्त आहेत. मासिक पाळी (Period Cycle) सुरळीत नसणे, त्यामध्ये अडथळे येणे, ओव्हुलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे गर्भधारणा न होणे, चेहऱ्यावर मुरुम किंवा केस येण्याची तक्रार तसेच वजन वाढणे ही पीसीओएसची लक्षणे आहेत. PCOS असणाऱ्या महिलांना मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो.


बीट गाजर रस


बीट आणि गाजरचा रस हे रक्त शुद्ध करणारे पदार्थ आहेत, ज्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास आणि मासिक पाळी नियमित होण्यासाठी मदत होते.


पद्धत : बीट आणि गाजरचे लहान तुकडे करा. एक ग्लास पाणी मिसळून मिस्कर किंवा ब्लेंडरमध्ये वाटून घ्या. यानंतर त्याचा रस काढा आणि हा रिकाम्या पोटी प्या.


कोरफड


कोरफड पाचन तंत्राच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, जे PCOS ग्रस्त महिलांसाठी आवश्यक आहे.


पद्धत : कोरफडीचा गर एक ग्लास पाण्यात मिसळा. यामध्ये चवीनुसार मीठ आणि मध घालावे. सकाळी अनोशेपोटी हे पाणी प्या. 


सोया मिल्क


सोया इंसुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते आणि टेस्टोस्टेरॉन कमी करण्यास मदत करते. शिवाय, हे कोलेस्टेरॉल आणि संप्रेरक पातळी कमी करण्याशी संबंधित आहे.


पद्धत : दररोज एक ग्लास सोया दुधाचे सेवन करा.


मेथी, दालचिनी आणि काळे मनुके प्या


मेथी मासिक पाळीचे नियमन आणि अंडाशयांच्या आरोग्यासाठी मदत करते. दालचिनी इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करते, तर काळ्या मनुकामध्ये रक्त शुद्ध करणारे गुणधर्म असतात जे PCOS च्या उपचारात मदत करतात.


पद्धत : एक ग्लास कोमट पाणी घ्या. यामध्ये 3 ते 4 काळे मनुके, दालचिनी आणि मेथी दाणे मिसळा. हे रात्रभर भिजवून रिकाम्या पोटी सेवन करणे, हे याचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग आहे. आठ आठवडे हे करुन पाहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल.


शतावरी


शतावरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॉलिक अॅसिड असतात. हे एक अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते, जे स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीचे संरक्षण करते. शतावरी स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवते.


पद्धत : एक कोमट दूध किंवा पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा शतावरी पावडर मिसळा. आता हे रोज सकाळी प्या.


अश्वगंधा


अश्वगंधा ही नैसर्गिक ऊर्जा उत्तेजक आहे. हा PCOS साठी रामबाण उपाय आहे.


पद्धत : एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळा. हे रात्री झोपण्याआधी पिणे जास्त फायदेशीर ठरेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Winter Health Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणं पडेल महागात, 'हे' 3 तोटे माहितीयत?