Hot Water Bath or Cold Water Bath in Winter : हिवाळ्यात (Winter) अंघोळ (Bath) करणं हा जणू टास्क असतो. त्यातच हिवाळ्यात (Winter Tips) थंड पाण्याने (Cold Water Bath) अंघोळ करायचं म्हटलं तर अनेकांचा थरकाप उडतो. बहुतेक जण हिवाळ्यात छान गरम कडकडीत पाण्याने (Hot Water Bath) अंघोळ करण्याचा आनंद घेतात. काहीजण तासनतास कडकडीत पाण्यात अंघोळ करतात. पण हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणं महागात पडू शकतं. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने देखील तुमचं नुकसान होऊ शकतं, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर सविस्तर जाणून घ्या. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे. होय, जर तुम्ही जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केली तर ते तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.


हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय तर, सावधान!


हिवाळ्यात अंघोळ करणे म्हणे एखादं युद्ध लढवण्यासारखं आहे. पहाटेच्या गारठ्यात अंघोळ करणं अनेकांना नकोसं वाटतं. त्यातच थंड पाण्याने अंघोळ करण्याच्या साध्या विचाराने कापरी भरते. यामुळेच बहुतेक लोक हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. अनेकांना कडकडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. जर तुम्हीही हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर हे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. 


हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणं पडेल महागात


हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी बहुतेक जण गरम पाणी वापरतात, पण असं करणं महागात पडू शकतं. हिवाळ्यात गरम पाण्याचे अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काळजी न घेतल्यास हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने किती नुकसान होऊ शकतं. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे जाणून घ्या.


कडकडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे दुप्षपरिणाम



  • तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी वाईट ठरते.

  • तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर आणि मन या दोन्हींवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

  • आपल्या त्वचेवर केराटिन नावाच्या पेशी असतात. गरम पाणी त्वचेच्या केराटिन पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा आणि पुरळ उठणे यासारख्या समस्या उद्भवतात.

  • यामुळे हिवाळ्यात नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी, कडकडीत गरम पाण्याचे अंघोळ करणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ice Bath Benefits : सेलिब्रिटींमध्ये आइस बाथची क्रेझ, बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे भन्नाट फायदे