Child Death due to Balloon : खेळण्या-खेळण्यात चिमुकल्याचा (Child) करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुग्यामुळे (Balloon) चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अमरोहा (Amroha) येथे घडली आहे. फुगा फुगवताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत (UP News) आहे. कुटुंबियांनी चिमुकल्याचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कुणी विचारही केला नव्हता की, फुग्यासोबत खेळताना चिमुकल्याला जीव गमवावा (Child Death While Inflating Balloon in UP) लागला.
फुग्यासोबत खेळताना चिमुकल्याचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकल्याला रुग्णालयात (Hospital) नेण्याआधीच चिमुकल्याने (Child Death News) प्राण सोडला होता. फुगा (Balloon) फुगवताना अचानक फुटला आणि याचा तुकडा चिमुकल्याच्या तोंडातून (Mouth) श्वसननलिकेत (Respiratory Tract) जाऊन अडकला. यानंतर चिमुकल्याचा श्वास गुदमरला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी लहानग्याचा रुग्णालयात दाखल केलं, पण त्याआधी चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. खेळता-खेळता चिमुकल्याचा मृत्यू होऊ शकतो, असा विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर; नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील गजरौला येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत बालकाचं वय 10 वर्ष (Ten Years Child Died) होते. तो इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. गुरुवारी चिमुकला घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी त्याने खेळताना तोंडाने फुगा फुगवण्यास सुरुवात केली. फुगवताना फुगा फुटला आणि त्याचा तुकडा त्याच्या तोंडात गेला. फुगा घशात अडकल्याने त्याला त्रास होऊ लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास (Breathing Problem) होऊ लागला आणि त्यानंतर तो बेशुद्ध (Unconcious) होऊन जमिनीवर पडला.
त्यानंतर एकत्र खेळणाऱ्या मुलांनी ही बाब चिमुकल्याच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तात्काळ मुलाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. पण, तेथील डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं. यानंतर मृताच्या कुटुंबावर शोककळा पसरली. चिमुकल्याच्या आईला फार मोठा धक्का बसला आहे. आपला चिमुकला असा अचानक जग सोडून जाईल यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :