How to Get Rid of Bad Breath : काही लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते, अशा वेळी अनेकांना लाजिरवाणं वाटतं. एखाद्याच्या तोंडातून वास येऊ लागला तर लोक त्याच्या जवळ जाणं टाळतात. तोंडातून दुर्गंधी येते, हे माहीत असूनही लोक अनेकांना त्यावर उपाय सापडत नाही. तोंडातून दुर्गंधी येण्याच्या आजाराला हॅलिटोसिस (Halitosis) म्हणतात. साधारणपणे तोंडात सामान्य बॅक्टेरिया असल्यास किंवा तोंडाची साफसफाई योग्य प्रकारे न केल्यास तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. या प्रकारची दुर्गंधी दोन-चार दिवसांत निघून जाते, पण तोंडाला किंवा दातांना संसर्ग झाला असेल तर, दुर्गंधी जास्त काळ राहते आणि लवकर जात नाही. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, चारपैकी एका व्यक्तीच्या तोंडाला कधी ना कधी तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.


तोंडाला दुर्गंधी का येते?


क्लीव्हलँड क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, तोंडातील लाळ सूक्ष्मजीव नष्ट करते पण, जेव्हा तुम्ही जास्त धूम्रपान करता किंवा काही औषधे घेता तेव्हा तोंडातील लाळ कमी होते. तोंड कोरडे झाल्यास, म्हणजेच तोंडात कमी लाळ किंवा थुंकी निर्माण झाल्यास तोंड कोरडे होऊ लागते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जर तुम्ही पोटाशी संबंधित आजार GERD म्हणजेच ऍसिडिटीने त्रस्त असाल तर, त्यामुळे तोंडात संसर्गही होऊ शकतो, ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. ॲसिडिटीममुळे पोटातील ॲसिड किंवा द्रवपदार्थ तोंडामध्ये पोहोचतात. ज्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया देखील असतात. त्यामुळे तोंडात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यासोबतच दात किंवा हिरड्यांशी संबंधित आजार असतील तर तोंडातून दुर्गंधी येण्याचा धोका सर्वाधिक असतो. हिरड्यांचा सर्वात सामान्य रोग म्हणजे हिरड्यांचा दाह, ज्यामुळे हिरड्या किडतात. या आजारांपासून सुटका मिळवू तोंडातील दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.


श्वासाची दुर्गंधी कशी दूर करावी?


हिरड्या किंवा दातांशी संबंधित आजार असल्यास त्यावर त्वरित उपचार करा. तुमच्या श्वासातून दुर्गंधी येऊ नये असे वाटत असेल तर आजार होण्याची वाट पाहू नका. त्याआधीचे टाळायचं कसं ते हे जाणून घ्या. 


'हे' उपाय करा



  • दिवसातून दोनदा ब्रश करा. किमान दोन मिनिटे ब्रश करा. 

  • ब्रश दातांवर वर आणि खाली हलवून ब्रश करा आणि आडव्या दिशेने नाही. 

  • ब्रश करताना जीभ स्वच्छ करणं महत्वाचं आहे. 

  • अल्कोहोल फ्री असलेले अँटीबॅक्टेरियल माउथवॉश वापरा. 

  • पुरेशा प्रमाणात पाणी प्या. 

  • नियमित दात तपासणी करा. 

  • तोंडातील लाळ वाढवण्यासाठी अधूनमधून शुगर फ्री गम चावा. यासोबतच तो कधी-कधी लवंगा चघळल्यासही उत्तर आहे. 

  • श्वासातून दुर्गंधी येत असेल तर गाजर आणि सफरचंद खा. 

  • तुम्ही सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि कॅफिनयुक्त पेयांपासून जितके दूर राहाल तितकी तोंडाला दुर्गंधी येण्याची शक्यता कमी होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covid-19 JN1 : देशात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, 'या' आयुर्वेदिक उपायांनी स्वतःचा बचाव करा