Waiter Spilled Hot Tea on Child : मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) वेटरेने (Waiter) चिमुकलीच्या अंगावर गरम चहा पाडल्याची घटना घडली आहे. अंगावर गरम चहा पडल्याने चिमुकलीला दुखापत झाली. या प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारवरून हॉटेलच्या वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या अंधेरीतील जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेल (J.W. Marriott Hotel) मध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता वेटरवर गुन्हा दाखल झाला आहे.


अंगावर गरम चहा सांडल्याने चिमुकली जखमी


सहार पोलीस स्टेशनमध्ये 29 सप्टेंबर रोजी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 337 अंतर्गत जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, 50 वर्षीय निशांत जैन (Nishant Jain) हे एंजल ब्रोकिंग कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी आहेत. जैन यांनी पोलीस जवाब दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी 24 सप्टेंबर रोजी अंधेरी पूर्व मध्ये जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेल (J.W. Marriott Hotel) मध्ये एक रूम बुक केली होती. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि 14 वर्षांची सारा आणि 7 वर्षांची मायरा या त्यांच्या दोन मुली होत्या.


मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधील प्रकार


जैन कुटुंब 29 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी आले. मायरा काउंटरवरून नाश्ता घेत असताना मोनालिसा बासुमती नावाची वेटर गरम चहाची किटली असलेला ट्रे घेऊन जात होती.  फिर्यादीनुसार, वेटरने तिच्या समोर कोण आहे, हे तिला दिसले नाही आणि त्यामुळे ती अचानक मायराशी आदळली आणि गरम चहा मायराच्या डाव्या हातावर सांडला. गरम चहा अंगावर सांडल्यामुळे मायराला दुखापत (Burn Injury) झाली, त्यामुळे मायरा जोरजोरात रडू लागली. 


वेटरवर गुन्हा दाखल


मायराच्या वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिचे निदान करत सांगितलं की, तिला एलएफ फोअरआर्म 6 ते 7 टक्के बर्न्स आहेत. त्यानंतर, जैन कुटुंबाने मायराच्या आजोबांच्या भेटीसाठी ठाण्याला (Thane City) गेले. मायराचे आजोबा विलासचंद्र पोरवार (Vilaschandra Porwar), वय 72 वर्ष यांनी 29 सप्टेंबर रोजी सहार पोलीस ठाण्यात (Sahar Police Station) त्या वेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला.


वेटरकडून मायराला ओरडा


या प्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका परदेशी व्यक्तीने यावेळी काय घडलं हे सांगितलं. या परदेशी व्यक्तीने सांगितलं की, मायराच्या अंगावर गरम चहा सांडल्यांतर वेटरकडून मायराला ओरडली.


महत्वाच्या इतर बातम्या :


महिलेच्या विचित्र सवयीने नागरिक हैराण, गाड्यांमधून पेट्रोल चोरून करायची चक्क नशा!