Surrogacy : बाईचा जन्म म्हटला की तीने आई होणं हे समीकरण माणसाच्या उत्क्रांतीपासून ते कदाचित अंतापर्यंत न बदलण्यासारखं आहे. यात फक्त बदल होत गेले ते मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेचे. मग ते मेडिकल रिजन असो किंवा मातेंचं वैयक्तिक कारण. मुलाला जन्म देणं किंवा न देणं हा निर्णय घेण्याचा अधिकार आईला आहेच, पण आता बदललेल्या आणि प्रगत झालेल्या मेडीकल सायन्सने कायद्याच्या चौकटीत राहून स्त्रियांसमोर अनेक पर्याय ठेवले आहेत. यातील एक पद्धत म्हणजे सरोगसी आई (Surrogate Mother) होण्याची. अनेकांनी हा शब्द बऱ्याचदा ऐकला असणार. त्यातल्या त्यात एखाद्या सेलिब्रेटीने सरोगसी मदर होण्याची बातमी हमखास नजरेस पडते. अभिनेत्रींपैकी प्रियांका चोप्रा असो, गौरी खान किंवा आत्ताचे नयनतारा आणि प्रिती झिंटा..अशी कित्येक नावं आपण सरोगसीसाठी ऐकली आहेत. पण, सरोगसी (Surrogacy) माता होण्याचे कायद्याच्या दृष्टीकोनातून नियम काय आणि सामान्यांना या अशा खर्चिक प्रक्रिया अवलंबण्यासाठी काय करावं लागणार या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सरोगसी म्हणजे काय? आणि सरोगसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. सध्या सरोगसी संदर्भातील कायद्याबाबत अनेकजण चर्चा करतायत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही विशेष प्रकरणे वगळता, जानेवारी 2022पासून देशात कमर्शियल (commercial) सरोगसी ही बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे नयनतारा आणि विग्नेश यांनी नियमांचे उल्लंघन केलेले असू शकते, असंही म्हटलं जातंय. आणि सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्याबद्दल जाणून घेऊयात...
सरोगसी म्हणजे काय?
एखाद्या दाम्पत्याला जर मूल होत नसेल तर ते एका महिलेच्या गर्भामध्ये त्यांचे मूल वाढवू शकतात. ज्या जोडप्याला बाळ हवं आहे, त्या जोडप्यामधील पुरुषाचे शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भ तयार केला जातो. तो गर्भ एका वैद्यकिय प्रक्रियेद्वारे एका महिलेच्या गर्भामध्ये ठेवला जातो. ज्या महिलेच्या गर्भात हे बाळ वाढते, त्या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हटलं जातं. 9 महिन्यांनंतर बाळाचा जन्म झाल्यावर, करारानुसार, ते मूल जैविक पालकांकडे सोपवलं जातं. (ज्यांच्या शुक्राणूने मूल झाले)
सरोगेसीमध्ये देखील दोन प्रकार आहेत. पहिली म्हणजे पारंपारिक सरोगसी आणि दुसरी गर्भधारणा सरोगसी.
1. पारंपारिक सरोगसी : गर्भावस्थेतील सरोगसीचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकाराला अल्ट्रास्ट्रिक सरोगसी असे म्हटले जाते जेव्हा जोडपे एखाद्या सरोगेट महिलेला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देतात आणि सर्व खर्च त्यांच्याकडून केला जातो.
2. गर्भधारणा सरोगसी : गर्भधारणेच्या सरोगसीमध्ये, सरोगेट आईचा मुलाशी कोणताही अनुवांशिक संबंध नसतो. या सरोगसीमध्ये सरोगेट आईची अंडी वापरली जात नाहीत आणि ती मुलाला जन्म देते. यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी (IVF तंत्र) द्वारे पालकांचे शुक्राणू आणि अंडी जुळल्यानंतर सरोगेट मातेच्या गर्भाशयात त्याचे रोपण केले जाते.
2019 मध्ये काय होता कायदा?
2019 च्या नियमांनुसार, सरोगसीसाठी सरोगेट महिलेकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच ती सरोगेट माता बनू शकते. दुसरीकडे, सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्याकडे ते आई किंवा वडील होण्यासाठी अयोग्य असल्याचा पुरावा असायला हवा. आता नवीन सरोगसी नियमन विधेयक 2020 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्यात. जुन्या नियमानुसार महिलेचे वय 21 ते 35 वर्षे होते परंतु आता ते 25 ते 35 वर्षांपर्यंत करण्यात आले आहे. तसेच, सरोगेट आईचे आधीच लग्न झालेले असावे आणि तिला आधीच मूल असावे, असा जुना नियम सांगायचा.
काय आहेत नवे नियम?
सरोगसी नियमन कायदा 2021 नुसार व्यावसायिक सरोगसीला बंदी घालण्यात आली आहे. 25 डिसेंबर 2021 रोजी संसदेने विधेयक मंजूर केले. राष्ट्रपतींनी 25 जानेवारी 2022 रोजी या कायद्याला मान्यता दिली. या कायद्याअंतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, म्हणजेच केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई पैसे घेणार नाही, फक्त तिला जो काही वैद्यकीय खर्च आहे तो आणि जीवन विमा द्यावा लागतो. नातेवाईकांमधील महिला, मैत्रिणी या सरोगेट मदर होऊ शकतात.
एक महिला फक्त एकदाच सकोगेट मदर होऊ शकतो. त्याचबरोबर ‘सरोगेट मदर’ विवाहीत आणि उत्तम प्रकृती असलेल्या किमान एका आपत्याची आई असायला हवी. देशात केवळ भारतीय जोडप्याला सरोगसीची परवानगी आहे. सरोगेट आईला 36 महिन्यांसाठी विम्याखाली कव्हर केलं जातं. त्याचबरोबर यात महत्वाचा मुद्दा हा की भारतात LGBTQIA समुदाय अजूनही सरोगसीसाठी पात्र मानला जात नाही.
महत्वाच्या बातम्या :
Surrogacy: सरोगेसी म्हणजे काय? सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? जाणून घ्या...