Healthiest Superfood : अनेक वेळा कामाच्या धावपळीत आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र शरीराला पोषक आहार आणि योग्य आराम मिळाल्यास आपण तंदुरुस्त राहतो. हेल्दी फूड म्हणजे पोषक आणि संतुलित आहार आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप लाभदायक असतो. अशा हेल्दी फूडचं सेवन नक्की केलं पाहिजे, यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. तुमच्या डाएटमध्ये सुपरफूडचा समावेश करा. 'या' 10 सुपरफूडचा समावेश केल्याने शरीर तंदुरुस्त राहत वजन कमी करण्यास मदत होईल.


1. बेरी : नाश्त्यामध्ये बेरीचा समावेश करावा. यामध्ये कमी कॅलरीज असतात. एक कप ताज्या बेरीमध्ये फक्त 80 कॅलरीज असतात. बेरी हे अँटिऑक्सिडंटने भरपूर असं फळ आहे. ते खाल्ल्याने बुद्धी तल्लख राहते. बेरी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो.


2. केल : केल (Kale) कमी कॅलरी सुपरफूड आहे. या गडद हिरव्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह आढळते. हा फायबरचा चांगला स्रोत आहे. एक कप केल भाजीमध्ये फक्त 10 कॅलरीज असतात.


3. सफरचंद : सफरचंद खाल्ल्याने शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषण मिळते. सफरचंदात भरपूर फायबर असते. डॉक्टरही रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. एक सफरचंद खाल्ल्याने शरीराला 100 कॅलरीज मिळतात. सफरचंदात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.


4. डाळिंब : रोज डाळिंब खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह मिळते. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब खाल्ल्याने हृदयविकार, कर्करोग, जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात. दररोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस प्यावा.


5. दही : रोज दही सेवन करणं अतिशय लाभदायक आहे. दही विशेषत: ग्रीक योगर्टमध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनचा असतात. सुमारे दीडशे ग्रॅम ग्रीक योगर्टमधून 80 कॅलरीज आणि 14 ग्रॅम प्रथिनं मिळतात. 


6. पालक : पालक लोह आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. जेवणात पालकचा समावेश नक्की करा. तुम्ही पालक सूप, रस किंवा भाज्या खाऊ शकता. पालक खाल्ल्याने वजन कमी होण्यास आणि डोळ्याचे आरोग्य राखण्यासही मदत होते.


7. ब्रोकोली : ब्रोकोली हे कमी कॅलरीज असणारं सुपरफूड आहे. ब्रोकोली खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फोराफेन असते, हे शरीरात जमा झालेली चरबी कमी करते. यामध्ये आढळणारे फायटोकेमिकल कंपाऊंड प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, स्किन, टॉयलेट आणि ओरल कॅन्सर टाळण्यास मदत करते.


8. गाजर : गाजरांमध्ये कर्करोगविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए युक्त गाजर खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात. अर्धा कप गाजर खाल्ल्याने 40 कॅलरीज मिळतात. आहारात गाजरच समावेश करणं गरजेच आहे.


9. बिया : तुम्ही आहारात बियांचा नक्की समावेश करायला हवा. बिया निरोगी चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही भोपळ्याच्या बिया, चिया बिया, अंबाडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि टरबूजाच्या बिया खाऊ शकता. 


10. भोपळी मिरची : भोपळी मिरची म्हणजेच शिमला मिरची सारख्या पिष्टमय नसलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. हिरवा, लाल आणि पिवळा भोपळी मिरचीमधून तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्वं मिळतील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.