Ganesh Utsav 2022 Paan Modak Recipe : वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात 31 ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. डेकोरेशनपासून बाप्पाच्या आवडता नैवेद्य मोदकाची तयारीही सुरु झाली असेल. कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य करायाचा याचं प्लॅनिंग सुरु झालं असेल. त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही खास पान मोदकाची रेसपी घेऊन आलोय. घरच्याघरी पान मोदक कसा तयार करायचा याची रेसपी जाऊन घेऊयात... 
 
पान मोदक करण्यासाठी साहित्य काय?
खायची सहा पाने
तूप -  एक मोठा चमचा 
बारीक साखर - एक मोठा चमचा 
गुलकंद - एक मोठा चमचा 
गुलाबची सुखलेली पाने - एक मोठा चमचा 
कंडेंस्ड मिल्क-1/4 कप
सूखलेल्या नाराळचा खिस -1/2 कप
फूड रंग -2 थेंब
टूटी-फ्रूटी - 2 चमचे


पान मोदक  तयार करण्याची कृती काय? :
- पान मोदक तयार करण्यासाठी सर्वात आधी देठ काढून पानाचे लहान तुकडे करा 
मिक्सरमध्ये कंडेंस्ड दूध, पानाचे तुकडे आणि साखर टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या
- पॅन घ्या ... 
- पॅन गरम झाल्यानंतर तूप टाका... त्यानंतर लगेच नाराळचा खिस टाकून व्यवस्थित भाजून घ्या 
- त्यानंतर पान-साखरेची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा
- या मिश्रणाला दोन मिनिटं व्यवस्थित भाजा
- त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा रंग टाका...
- हे मिश्रण व्यवस्थित मिसळा 
- चव वाढवण्यासाठी आणि मिश्रण घट्ट होण्यासाठी थोडं खिसलेलं खोबरं, गुलकंट, टुटी फ्रुटी आणि एक चमचा कंडेंस्ड मिल्क टाका...  
- या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करा... 
- थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
- मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
- तुमचे चविष्ट पान मोदक तयार झाले. 


 बाप्पाचं आगमन यंदा कधी होणार? 
यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे.


आणखी वाचा - 


Ganesh Chaturthi Recipes : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी बनवा स्वादिष्ट खव्याचे मोदक; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है
Ganesh Chaturthi 2022 Chocolate Modak : बाप्पाचं स्वागत करा चॉकलेट मोदकाने; जाणून घ्या कृती...