Heart Attack or Cardiac Arrect while Workout : गेल्या काही महिन्यांमध्ये देशात अनेक तरुणांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अचानक ह्रदयाची हालचाल थांबवल्याने बहुतेकांचा मृत्यू झाला आहे. जीममध्ये वर्कआऊट करतानाही मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. कोविड-19 विषाणूच्या उद्रेकानंतर भारतात हृदयविकाराचा झटका आणि कार्डियक अरेस्टमुळे अनेक मृत्यू झाले आहेत.
फिटनेस फ्रिक लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त
कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर भारतात अनेक मृत्यू झाले आहेत, महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांमध्ये तंदुरुस्त दिसणारे तरुणा, सेलिब्रिटी आणि शाळकरी मुलांचाही समावेश असून ही चिंतेची बाब आहे. अलिकडेच, योगेश सिंग या इयत्ता नववीच्या विद्यार्थी जयपूरमधील एका खाजगी शाळेच्या वर्गात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. आठवडाभरापूर्वी, कर्नाटकातील चिक्कमगलुरू जिल्ह्यात शाळेत सातवीच्या वर्गातील 13 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
व्यायाम करण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तंदुरुस्त आणि फिट राहिल्याने आजार दूर ठेवता येतात, असं म्हटलं जातं. पण, गेल्या काही महिन्यांमध्ये तरुण, तंदुरुस्त आणि फिटनेस फिक्र लोकांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यामुळे फिट राहण्याची इच्छा असणाऱ्या आणि व्यायाम करण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तरुणांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं
मुंबईतील सर एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील पुनर्वसन आणि क्रीडा औषधांचे संचालक डॉ. आशिष कॉन्ट्रॅक्टर यांच्या मते, "तरुण आणि तंदुरुस्त व्यक्तींमध्ये जास्त व्यायाम केल्यामुळे मृत्यू झाल्याचं आढळलं आहे. निरोगी हृदय असलेल्या व्यक्तीमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका क्वचितच येतो." डॉ. कॉन्ट्रॅक्टर यांनी आयएएनएसला सांगितलं. "व्यायामामुळे हृदयविकाराची समस्या ट्रिगर शकते, जे ह्रदयविकार लपलेले असून समोर आलेले नाही, पण हे ह्रदयविकाराचं कारण असू शकत नाही."
व्यक्तींना अचानक ह्रदयासंबंधित समस्या उद्भवणे किंवा व्यायामानंतर त्यांचा मृत्यू होणे याची अनेक संभाव्य कारणे आहेत. फिटनेस ट्रेंड आणि सोशल मीडियावरील लाईफस्टाईल, व्यायामाचं वेळापत्रक यामुळे काही लोक जास्त व्यायाम करतात. त्याचाही यावर काहीसा परिणाम असू शकतो, अशी माहिती डॉ. कॉन्ट्रॅक्टर यांनी IANS ला दिली आहे.
हृदयविकाराचा धोका कसा वाढतो?
तज्ज्ञांच्या मते, उच्च सोडियमयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अति मद्यपान, बैठी जीवनशैली यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. आरोग्य तज्ञांच्या मते, उच्च हिमोग्लोबिन पातळीमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका देखील वाढू शकतो. पॉलीसिथेमिया ही अशी स्थिती आहे जिथे अस्थिमज्जामधील विकृतीमुळे मानवी शरीरात लाल पेशी वाढतात. या अतिरिक्त पेशी रक्त घट्ट करतात, त्याचा प्रवाह कमी करतात आणि रक्ताच्या गुठळ्या सारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. ज्यामुळे कार्डियक अरेस्ट किंवा ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो.