How Salt Affects Blood flow To The Brain : चविष्ठ अन्न बनवण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो. मात्र मिठाच्या अतिवापरामुळे नुकसानही होतं. मिठाच्या वापराचा परिणाम मेंदूतील रक्त प्रवाहावर होत असल्याची धक्कादायक माहिती एका अभ्यासात उघड झाली आहे. जॉर्जियातील संशोधकांच्या अभ्यासातून याबाबतचा खुलासा झालाय. मेंदूतील रक्तप्रवाह आणि मिठाचा वापर याबाबतचं पहिल्यांदाच संशोधन झालं. यामध्ये अनेक माहिती समोर आली आहे. या संशोधनात मेंदूतील न्यूरॉन अॅक्टिव्हिटी आणि मेंदूमध्ये होणाऱ्या रक्त प्रवाह यांच्यातील संबंधांबद्दल तसेच मिठाच्या सेवनामुळे याच्यावर होणाऱ्या परिणांबाबत आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. न्यूरोसायन्सचे प्राध्यापक डॉ. जेवियर स्टर्न यांच्या नेतृत्वाखाली जॉर्जिया येथे मेंदूच्या रक्तप्रवाहावर मिठाचा परिणाम कसा होतो, यावर संशोधन करण्यात आलं.


मज्जातंतू (neurons – न्यूरॉन्स) जेव्हा कार्यान्वित होतात, तेव्हा  विशेषत: त्या भागांमध्ये रक्त प्रवाह अधिक वेगवान करतात.  हा संबंध मज्जासंस्था जोडणे अथवा फंक्शनल हायपरिमिया म्हणून ओळखला जातो. मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे (फंक्शनल मॅग्नेटिक रिसोर्स इमेजिंग fMRI) हे सर्व होतं, याला धमनी असे म्हटलं जातं. जॉर्जिया येथील अभ्यासकांनी मेंदूच्या विकारांचे निदान करण्यासाठी कमकुवत रक्तप्रवाहाचे क्षेत्र शोधलं.  न्यूरोव्हस्कुलर कपलिंगचे पूर्वीचे अभ्यास मेंदूच्या वरच्या भागांपुरते मर्यादित होते (जसे की सेरेब्रल कॉर्टेक्स) आणि शास्त्रज्ञांनी मुख्यतः पर्यावरणातून येणाऱ्या संवेदी उत्तेजनांना प्रतिसाद म्हणून रक्त प्रवाह कसा बदलतो याचे परीक्षण केले आहे.


संशोधकांनी मेंदूच्या रक्तप्रवाहाबाबत अधिक सखोल अभ्यास केला. त्यांनी हायपोथालमसवर लक्ष केंद्रीत केलं. जो मेंदूमधील एक भाग आहे, ज्यामध्ये पिणे, खाणे, शरीराचे तापमान नियमन आणि पुनरुत्पादन यासह शरीराच्या महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये सहभाग असतो. सेल रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात मिठाच्या सेवनामुळे मेंदूच्या रक्तप्रवाहात कसा बदल होतो, याचं परीक्षण करण्यात आलं आहे. रक्तप्रवाहातील बदलावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तथापि, मेंदूतील रक्तप्रवाहावर याआधी केलेलं संशोधन फक्त  वरवरच्या भागांपुरते मर्यादित होते. पण शास्त्रज्ञांनी मुख्यतः पर्यावरणातून येणार्‍या संवेदी उत्तेजनांनामध्ये (जसे की दृश्य किंवा श्रवणविषयक उत्तेजना) रक्त प्रवाह कसा बदलतो याबाबतचा अभ्यास आणि संशोधन करण्यात आलं आहे. हीच तत्त्वे मेंदूच्या आतील भागांवर लागू होतात की नाही याविषयी फारसे माहिती नाही. जे शरीरात निर्माण होणाऱ्या उत्तेजनांशी संबंधित आहेत, ज्यांना इंटरोसेप्टिव्ह सिग्नल म्हणूनही ओळखलं जातं.


“शरीराला सोडियमचे प्रमाण अतिशय अचूकपणे नियंत्रित करणे आवश्यक असल्यामुळे आम्ही मिठाची निवड केली. आमच्याकडे विशिष्ट अशा पेशीही आहेत, ज्या तुमच्या रक्तात किती मीठ आहे हे शोधतात. जेव्हा तुम्ही खारट अन्न खातात, तेव्हा मेंदूला ते जाणवते. यावेळी सोडियमची पातळी समान करण्यासाठी शरीरातील यंत्रणा सक्रिय होते, असं संशोधक डॉ. जेवियर स्टर्न यांनी सांगितलं.”


अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांनी आम्हाला आश्चर्यचकित केले. कारण, आम्ही रक्तवाहिन्यासंबित निरीक्षण केलं. जे संवेदी उत्तेजित होण्याच्या प्रतिसादात कॉर्टेक्समध्ये वर्णन केलेल्या बर्‍याच गोष्टींच्या विपरीत आहे. अल्झायमर किंवा स्ट्रोक किंवा इस्केमिया सारख्या रोगांच्या बाबतीत कॉर्टेक्समध्ये रक्त प्रवाह सामान्यतः कमी होतो, असे डॉ. जेवियर स्टर्न म्हणाले. जेव्हा आपण अतिप्रमाणात मीठ खातो तेव्हा आपल्यातील सोडियमची पातळी अधिक कालावधीपर्यंत उंचावते. हायपोक्सिया ही एक अशी यंत्रणा आहे जी सतत मीठ उत्तेजित होण्यास प्रतिसाद देण्याची न्यूरॉन्सची क्षमता मजबूत करते. ज्यामुळे त्यांना दीर्घ कालावधीसाठी सक्रिय राहण्याची परवानगी मिळते, असं आम्हाला वाटतेय. असेही जेवियर स्टर्न यांनी सांगितलं.