Health Care Tips : लोक चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल्स ट्राय करतात. पण काहींना पार्लरमधील प्रोडक्ट्स वापरल्याने त्रास होतो. त्या प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो आणायचा आसेल तर तुम्ही या गोष्टींचा समावेश डाएटमध्ये करावा.
 
दही- दही खाल्याने तुमची पचन क्रिया सुधारते. दह्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांचा समावेश जर तुम्ही डाएटमध्ये केला तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. त्याच बरोबर दह्यासोबत भात,  रायतं किंवा लस्सी इत्यादी पदार्थ खाल्याने चेहऱ्यावर तेज येईल तसेच तुम्ही बेसन पिठासोबत दही मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग जातील. 


लिंबू- लिंबाचा रस पोटासोबतच स्किनसाठी देखील चांगला असतो. रोज लिंबू पाणी प्यायल्याने पोटासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील. तसेच लिंबीच्या रसामध्ये साधे पाणी किंवा ग्लिसरीन मिक्स केरून चेहऱ्यवर लावा. त्याने चेहऱ्यावर ग्लो येऊन त्वचा मऊ होते.    


दूध- रोज दोन ग्लास दूध प्यावे. तसेच चेहऱ्यावर कच्च दूध लावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. 
तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो. 


काकडीच्या पाण्याचा फेसपॅक - काकडी खिसून घ्यावी. त्यानंतर त्या खिसलेल्या काकडीचे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. त्या पाण्यामध्ये  एक चमचा लिंबूचा रस मिक्स करा. लिंबू मिस्क केलेलं हे काकडीचं पाणी फ्रिजमध्ये ठेवा. ठंड झाल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर लावा. कडीच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.  


Health Care Tips: Oily Skin असणाऱ्यांनी घरीच तयार करा 'हे' फेस पॅक; चेहऱ्यावर येईल ग्लो 
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित